NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / 10 Tips: नियोजन विशीतलं; मौज,मजा आणि आराम मिळेल तिशीत

10 Tips: नियोजन विशीतलं; मौज,मजा आणि आराम मिळेल तिशीत

खिशात आवश्यक तेवढा पैसा नसल्याने सगळीच स्वप्न जशीच्या तशी राहतात. जर तुम्ही विशीत योग्य नियोजन केलं तर तिशीत तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात.

111

पैसा असता तर फिरायला मिळालं असतं, जग फिरून आलो असतो एवढंच काय तर स्वतःवर खर्च केला असता असे अनेक विचार विशीत मनात येत असतात.

211

खिशात आवश्यक तेवढा पैसा नसल्याने सगळीच स्वप्न जशीच्या तशी राहतात. जर तुम्ही विशीत योग्य नियोजन केलं तर तिशीत तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात.

311

विशीत जर तुम्हाला पैसे कमावण्याची संधी मिळाली तर ती संधी दवडू नका. योग्य त्या मार्गाने परिश्रम करून पैसे कमवा. तसेच जी नोकरी करण्यात तुम्हाला अजिबात आनंद मिळत नसेल तर ती नोकरी करण्यात वेळ घालवू नका. तात्काळ ती नोकरी सोडून पुढे जा.

411

आनंदासाठी आणि यशासाठी फक्त तुम्हीच जबाबदार आहात. त्यामुळेच कोणतीही गोष्ट करताना तक्रार करू नका. उलट मिळेल ते काम आनंदाने करण्याचा प्रयत्न करा.

511

लोक तुमच्या कामाबद्दल अनेक गोष्टी बोलत असतील. ती प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची गरज नाही. तसेच त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी केल्याच पाहिजेत असं काही नाही. नोकरी बाबत तुम्हाला जे योग्य वाटतं ते करण्यााला प्राधान्य द्या.

611

अशा गोष्टींची यादी तयार करा ज्याबद्दल तुम्ही जराही तडजोड करू शकत नाही. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात आनंदी कसं राहता येईल याचं नियोजन करा.

711

प्रत्येक महिन्यात स्वतःचे गोल सेट करा आणि ते पूर्ण करण्याचा शक्यतो प्रयत्न करा.

811

तुम्हाला एखादी गोष्ट करण्यात भीती वाटत असेल तर त्या सर्व गोष्टी याच वयात करा. जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल तर स्कायडाइव करून तुम्ही तुमची ही भीती काढून टाका.

911

सतत फक्त बोलण्याने काहीच साध्य होत नाही. यापेक्षा कामातून स्वतःचा मुद्दा स्पष्ट करा.

1011

अनेकदा आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या कधी मिळत नाही आणि आपण ज्या गोष्टींचं नियोजन करतो त्या गोष्टीही सुरळीत होत नाहीत. अशावेळी आयुष्याला फार गांभीर्याने घेऊ नका. जे जसं चाललंय तसं चालू दे.

1111

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

  • FIRST PUBLISHED :