NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Face Shape Personality Test : चेहेऱ्याच्या आकारावरून ओळखू शकता एखाद्याचे खरे व्यक्तीमत्व

Face Shape Personality Test : चेहेऱ्याच्या आकारावरून ओळखू शकता एखाद्याचे खरे व्यक्तीमत्व

माणसांचा चेहऱ्यात अनेक गोष्टी लपलेल्या असतात. मग ते तुमचे व्यक्तिमत्व असो, तुमच्या भावना आणि वागणे असो किंवा तुमची विचारसरणी असो. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही एखाद्याचा चेहरा वाचता तेव्हा अशी सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते. लंबगोल चेहरा, चौकोनी चेहरा, त्रिकोणी चेहरा, डायमंड फेस, हार्टशेप फेस इत्यादी मानवी चेहऱ्याचे 5 आकार असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा आकार पाहून तुम्ही त्याचे व्यक्तिमत्त्व कसे ओळखू शकता.

15

डायमंड शेप : डायमंड शेप प्रकारचा चेहरा असलेले लोक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कामावर विश्वास ठेवतात. डायमंड शेप लोकांची संभाषण कौशल्ये खूप चांगले असते. तसेच तुम्ही त्यांच्या म्हणण्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता.

25

लंबगोल चेहरा : लंबगोल अथवा ओव्हल शेप या प्रकारचा चेहरा असलेले लोक व्यावहारिक असतात. ओव्हल आकाराचे लोक महत्त्वाकांक्षी असतात, त्यांची भाषा चांगली असते आणि ते लोकांशी खूप गोड वागतात. लोकांना आनंदी ठेवण्यासाठी कोणती वागणूक ठेवली पाहिजे हे त्यांना माहीत असते.

35

चौकोनी चेहरा : चौकोनी चेहरा असलेले लोक उर्जेने भरलेले असतात आणि त्यांच्यात खूप वेळ तग धरण्याची क्षमता असते. यामुळेच त्याला मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करायला आवडते. असे म्हणतात की ते जन्मजात लीडर असतात. जरी ते खूप तणावपूर्ण वातावरणात असले तरीही त्यांचे वागणे अगदी शांत असते.

45

त्रिकोणी चेहरा/ ट्रँग्यूलर फेस : त्रिकोणी चेहरे असलेले लोक जन्मजात कलाकार, क्रिएटिव्ह आणि संवेदनशील असतात. पण या लोकांना छेडणे टाळले पाहिजे कारण हे लोक खूप आक्रमक देखील होतात. त्यांच्या खास स्वभावामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

55

हार्टशेप फेस : हार्टशेप म्हणजे हृदयाच्या आकाराचा चेहेरा असलेले लोक खूप कल्पनाशील, क्रिएटिव्ह, कुशल बुद्धिमत्ता आणि कौशल्याने परिपूर्ण असतात. तसेच असे लोक कणखर मनाचे, हट्टी स्वभावाचे असतात. कठीण परिस्थितीतही ते सहजासहजी तडजोड करत नाहीत.

  • FIRST PUBLISHED :