NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण...

हेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण...

भाज्या शिजल्यावर त्यातील पोषक घटक कमी होतात हे खरं असं तरी, काही भाज्या न शिजवता खाण्याचेही दुष्परिणाम असतात.

16

प्रमाणापेक्षा जास्त भाज्या खाणं किंवा कच्च्या भाज्या खाणं आरोग्यासाठी हानिकारक असतं. काही भाज्यांचं अतिसेवन आपल्या शरीरावर वाईट परिणाम करतं.

26

बीट खाल्ल्यामुळे शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढतं. वजन कमी करायचं असेल तरी बीट उपयोगी आहे. बीटचा वापर सॅलड आणि सँडविचमध्ये केला जातो. काही लोक बीटचा ज्युसदेखील आवडीने पितात. मात्र अति प्रमाणामध्ये बीट खाल्ल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

36

बीटमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सालेट असतं. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. याशिवाय बीट जास्त प्रमाणात खाल्लं तर शरीरात कॅल्शियमच्या शोषणामध्ये अडचण येते.

46

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असलेलं गाजर जास्त प्रमाणात खाल्लं तर आपल्या त्वचेवर त्याचे वाईट परिणाम होतात. गाजरामध्ये बिटा केरोटीन असतं जे आपल्या शरीरात जास्त गेलं तर ब्लडमध्ये जाण्याऐवजी त्वचेवर जमा व्हायला लागतं. ज्यामुळे हात, पाय, टाचांचा रंग बदलू लागतो.

56

फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली यांचा वापर सॅलडमध्ये केला जातो मात्र या कच्च्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस आणि अपचनसारखे त्रास होतात.

66

या भाज्या कच्च्या असताना त्यामध्ये पोटात न विरघळणारी शुगर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच या भाज्या कच्च्या खाण्यापेक्षा वाफवून खाव्यात.

  • FIRST PUBLISHED :