भूकंपाने तुर्की, सीरिया हादरल्यानंतर चीन, अफगाणिस्तान, नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. भारतातील दिल्ली, आंध्र प्रदेश, धर्मशाला, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यातही काही ठिकाणी भूंकपाचे धक्के बसल्याचं सांगितलं जातं आहे.
भारतात मोठ्या भूकंपाचा धोका आहे, असा इशारा भारतातील हवामानतज्ज्ञ आणि भूगर्भशास्त्राज्ञांनी दिला आहे.
हैदराबादमधील जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्युटचे शास्त्रज्ञ डॉ. एन पूर्णचंद्र राव यांनी भारतीय टेक्टोनिक प्लेट दरवर्षी 5 सेमी वेगाने सरकत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे हिमालयातील तणाव वाढत असून भूकंपाचा धोका वाढतो आहे.
भारतातील भूकंपाचा धोका असलेली ठिकाणं 2 ते 5 झोनमध्ये विभागली गेली आहेत. दोन झोनमध्ये असलेल्या ठिकाणांना सर्वात कमी धोका तर पाचव्या झोनमध्ये असलेल्या ठिकाणांना सर्वात जास्त धोका आहे.
झोन 5 मधील ठिकाणं - यात ईशान्य भारताचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, गुजरातमधील कच्छ, उत्तर बिहार, अंदामान-निकोबार बेट.
झोन 4 मधील ठिकाणं - जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचा उरलेला भाग, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेश-बिहार-पश्चिम बंगालचा उत्तरेकडील भाग, गुजरात आणि महाराष्ट्राचा पश्चिमेकडील काही भाग, राजस्थान.
झोन 3 मधील ठिकाणं - केरळ, गोवा, लक्षद्वीप, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगालचा इतर भाग, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक.
झोन 3 मधील ठिकाणं - देशाचा इतर उरलेला भाग या झोनमध्ये येतो.
स्कायमेटच्या माहितीनुसार या राज्यांतील काही शहरांना भूकंपाचा सर्वात जास्त धोका आहे.
पाचव्या झोनमधील शहरं - आसाममधील गुवाहाटी, जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर
तिसऱ्या झोनमधील शहरं - महाराष्ट्रात समुद्रकिनारी असलेल्या मुंबईला त्सुनामीचा धोका, दुसऱ्या झोनमध्ये असलेलं चेन्नईही आता तिसऱ्या झोनमध्ये.
देशाची राजधानी सर्वाधिक भूकंपाचा धोका होण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांवर आहे.