एक तरुण एकाच वर्षात 23 मुलांचा जैविक पिता बनला आहे. खरं तर, त्याने सुरुवातीला हौस म्हणून शुक्राणू डोनेट केलं होतं, मात्र त्यानंतर हे त्याचं पूर्ववेळ काम झालं. आता तरूणाच्या या कृत्याचा तपास सुरू केला आहे.
हा प्रकार ऑस्ट्रेलियातील आहे. एलन फान नावाचा व्यक्ती देशात स्पर्म डोनेट करण्यासाठी खूप प्रसिद्ध झाला आहे. तरुणाचं म्हणणं आहे की महिला त्याचे स्पर्म हेल्दी असल्याकारणाने त्याला पसंत करतात.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार एलन स्वत: दोन मुलांचा बाबा आहे. मात्र त्याने खासगी स्वरुपात स्पर्म डोनेट करुन तब्बल 23 मुलांना जन्म दिला आहे. तो रजिस्टर्ड फर्टिलिटी सेंटरमध्येही स्पर्म डोनेल करतो.
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिसबेनमध्ये राहणारा 40 वर्षीय एलनची आता चौकशी केली जात आहे. काही फर्टिलिटी क्लिनिकने एलनविरोधात तक्रार केली होती. एलनवर आरोप आहे की त्याने वैध्य क्लिनिकमधून इतर स्पर्म डोनेट केले आणि मर्यादित सीमेपेक्षा अधिक मुलांना जन्म दिला.
ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिया कायद्यानुसार एक पुरुष केवळ 10 फॅमिली तयार करू शकतो. तर दुसरीकडे एलनचं म्हणणं आहे की, महिलांना नकार देणं त्याच्यासाठी खूप कठीण असतं. या कारणाने त्याने एका दिवसात तीन महिलांना स्पर्म डोनेट केलं.