गर्भावस्थेत आई स्वत:पेक्षा आपल्या बाळाची जास्त काळजी करत असते. काय करावं? काय करू नये? असं विचार सतत डोकावत असतात. काही असे प्रश्न असतात ज्यांची उत्तर केवळ तज्ज्ञांकडून घेणं चांगलं असतं.
कोणते पदार्थ खावेत? कोणते टाळावेत? आवश्यकता भासल्यास कोणती औषधं घेतली तर चालतील? असे प्रश्न मनामध्ये येतात. पदार्थांच्या बाबतीत तर, घरातली माणसं सल्ला देऊ शकतात. पण, औषधं तेही ऍन्टीबायोटिकबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य आहे.
फंगल, व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर, अँटिबायोटिक्स दिल्या जातात. हिच औषध बॅक्टेरीयाला संपवून त्याची वाढ थांबवतात. कधीकधी महिलांवर एखाद्या इन्फेक्शनमुळे अँटिबायोटिक्स घेण्याची वेळ येते.
अँटिबायोटिक्सचे शरीरावर साईडइफेक्ट होतात. तर, बाळावरही विपरीत परिणाम होऊ शकातात. 3 महिन्याच्या गर्भावर अँटिबायोटिक्सचा वाईट होऊ शकतो. याच काळात बाळाचे अवयव आणि पेशी विकसित होत असतात.
बाळ आणि आईच्या सुरक्षेचा विचार करता केवळे 10 टक्के ऍन्टीबायोटीक्स सुरक्षीत मानले गेले आहेत. त्यामुळे इन्फेक्सनचा विचार करुनचं डॉक्टर एखादं ऍन्टीबायोटीक्स योग्य प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतात.
बीटा-लॅक्टम, वॅनकोमायसिन, नाइट्रोफ्यूरन्टायन, मेट्रोनिडाजोल, क्लिंडामायसिन, फोसफोमायसिन, एन्सेफ, रोसफिन, जेंटामायसिन, नियोमायसिन ही औषध तज्ज्ञांच्या दृष्टीने सुरक्षीत आहेत. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय यांचं सेवन करु नयेत.
गर्भावस्थेत महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदलं होत असतात. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची भिती असते. युरिन ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच UTI, वजायनल इन्फेक्शन, श्वास, कान, घसा, नाकासंबंधी इन्फेक्शन या काळात होऊ शकतं.
त्यामुळे डॉक्टर गर्भवती महिलांना ऍन्टीबायोटीक्स घेण्याचा देऊ शकतात. याशिवाय गर्भावस्थेत प्रिटर्म लेबर, इंट्रापार्टम ताप, नियोनेटल ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस नावाचा ताप आणि सिजेरियन सॅक्शन करायची गरज पडल्यास महिलांना ऍन्टीबायोटीक्स दिली जातात.
तात्पुरत्या स्वरुपात घेतलेल्या ऍन्टीबायोटीक्सचा शरीरावर गंभीर परिणाम होतात. म्हणून ऍन्टीबायोटीक्सच नाहीतर, कोणतीही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं घेणं आवश्यक आहे. त्यातही गर्भावस्थेत केलेली छोटीशी चुक महागात पडू शकते.
अँटिबायोटीक्सचे (Antibiotics) शरीरावर साईड इफेक्ट (Side Effects) होतात. तर, बाळावरही विपरीत परिणाम होऊ शकातात. तीन महिन्याच्या गर्भावर अँटिबायोटिक्सचा वाईट होऊ शकतो.