1.चॉकलेट्स (Chocolates)- चॉकलेट्स आरोग्यासाठी हानिकारक असतात, त्यामुळं आपल्या मित्राच्या आरोग्यावर वाईट परिणाम करणारी गोष्ट भेट म्हणून देणं टाळावी.त्याऐवजी त्याला फळं, ड्रायफ्रूट्स अशा आरोग्यदायी वस्तू भेट द्याव्यात.
2. भेटकार्ड (Greeting cards)- आजकालच्या सोशल मीडियाच्या युगात भेटकार्ड देण्याची गरज भासत नाही. त्यापेक्षा तुम्ही मित्राच्या आवडती एखादी गोष्ट त्याला भेट द्या, ज्याचा त्याला उपयोग करता येईल.
3. महागड्या वस्तू (Costly Gifts)- तुमचा मित्र जर गरिब असेल आणि तुम्ही त्याला महागड्या वस्तू भेट दिल्या तर त्या बदल्यात तो तुम्हाला काही देऊ शकला नाही, याचं त्याला वाईट वाटेल.
4. पर्यावरणासाठी हानिकारक गोष्टी (Non Eco friendly things)- फ्रेंडशिप डे हा मैत्रीचा दिवस आहे. यादिवशी तुम्ही मित्रांना अशा गोष्टी देऊ नका, ज्यांमुळं पर्यावरणाला हानी पोहोचेल. जसं की प्लास्टिकच्या वस्तू किंवा ध्वनिप्रदूषण करणाऱ्या साऊंड सिस्टम, इत्यादी.
5. शोभेच्या वस्तू (Showcase things)- फ्रेंडशिप डे दिवशी मित्राला शोभेच्या वस्तू देऊ नयेत, त्याऐवजी त्याला अशा गोष्टी भेट द्याव्यात ज्याचा उपयोग होईल आणि त्या वस्तूंच्या स्वरूपात तुम्ही त्याच्या कायम सोबत राहाल.