NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Holi 2023 : होळीला रंग खेळण्यापूर्वी करा या गोष्टी, त्वचेवरील रंग काढणं होईल सोपं

Holi 2023 : होळीला रंग खेळण्यापूर्वी करा या गोष्टी, त्वचेवरील रंग काढणं होईल सोपं

होळी आणि रंगपंचमीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण उत्साहित असतात. मात्र अनेकदा रंगपंचमी खेळताना सरार्स रासायनिक रंगांचा वापर केला जातो. मग हे रंग त्वचेवरून घालवण्यासाठी अनेक खटाटोप करायला लागतात. यामुळे अनेकदा त्वचेवर एलर्जी होते. तेव्हा रंगपंचमीला रंग खेळण्याआधी या गोष्टी केल्यास त्वचेवरील रंग काढणं सहज सोपं होईल.

15

तेल लावणे : रंगपंचमी खेळण्यासाठी घराबाहेर पडताना त्वचेवर तेल लावा. तेल त्वचेच्या आत रंग जाऊ देत नाही. असे केल्याने होळी खेळल्यानंतर रंग सहज काढता येईल. यासाठी तुम्ही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल देखील वापरू शकता.

25

बर्फ वापरा : बर्फ आपल्या त्वचेचे छिद्र बंद करण्याचे काम करतो. त्यामुळे होळी खेळण्याआधी आपल्या चेहऱ्यावर बर्फाने साधारण 10 मिनिटे मालिश करा. यामुळे तुमच्या त्वचेच्या आत रंग जाणार नाही आणि यामुळे त्वचेचे नुकसान टळेल.

35

पूर्ण शरीर झाकेल असे कपडे घाला : होळी खेळायला बाहेर पडत असताना आपली त्वचा पूर्णपणे झाकली जाईल असे कपडे घालावेत. त्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा. त्यामुळे शरीराला अधिक रंग लागणार नाही.

45

सनस्क्रीनचा वापर करा : होळी खेळण्याआधी तुम्ही तेलाव्यतिरिक्त सनस्क्रीनचा वापर करु शकता. उन्हात होळी खेळण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या त्वचेवर सनस्क्रीन क्रीम लावल्यास त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करते. हे आपली त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझर ठेवण्यात मदत करते. त्यामुळे त्वचेवरील रंग देखील सहज निघतो.

55

लीप बाम आणि गॉगल वापर : होळी खेळण्यासाठी जाण्यापूर्वी ओठांवर लीप बाम लावा रंग ओठांमध्ये जाण्यापासून बचाव होतो. तसेच डोळ्यांना गॉगल लावल्यास डोळे काही प्रमाणात सुरक्षित राहता.

  • FIRST PUBLISHED :