घरात नवरा बायकोचं नातं म्हणजे एक नाजूक नातं असतं
त्याच नात्यावर घरातलं वातावरण अवलंबून असतं
ते नातं जेवढं चांगलं तेवढं घरात सूख नांदत असतं
त्यामुळे दोघांनीही कायम एकमेकांना समजून घेतच पुढे गेलं पाहिजे
एकमेकांच्या चुका समजून घेत काम केलं तरच घरात सुख नांदेल.
त्यासाठी एकमेकांना वेळ देत सकारात्मक गोष्टींवर चर्चा केली पाहिजे
दोघांनीही विषय तुटेपर्यंत न ताणता त्यावर तोडगा काढला पाहिजे.
कायम घरात हलकं फुलकं वातावरण राहिलं याची काळजी घेतली पाहिजे.