NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / गर्भावस्थेत एक गोळी करेल घात; व्यंग असलेलं बाळ येईल जन्माला

गर्भावस्थेत एक गोळी करेल घात; व्यंग असलेलं बाळ येईल जन्माला

गर्भावस्थेमध्ये आईने घेतलेल्या आहाराचा थेट परिणाम बाळावर होत असतो. हा परिणाम दीर्घकालीन सुद्धा असू शकतो. त्यामुळेच औषधं घेताना देखील आईने काळजी घ्यायला हवी.

19

गर्भावस्थेत कोणताही पदार्थ खाताना, त्याचा बाळावर काय परिणाम होणार याचा विचार केला जातो. जन्माला आलेलं बाळ विकृत असेल एखादं व्यंग असेल तर, जन्मभर ते दुःख पचवावं लागतं. त्यामुळे गर्भावस्थेमध्ये कोणतीही औषधं घेतानाही काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

29

गर्भावस्थेमध्ये महिलांना काही त्रास होत असतात. अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अशा त्रासांमध्ये घरात असलेली एखादी गोळी खाण्याने दुखणं थांबू शकतं. मात्र, या गोळ्यांचा बाळाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

39

युरोपियन जर्नल ऑफ युरोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन अहवालानुसार गर्भावस्थेमध्ये पॅरासिटॅमॉलचं जास्त घेतल्यास बाळाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

49

यामुळे लहानपणीच अटेन्शन डेफिसिएन्सी हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे ADHD हा त्रास सुरू होतो. यासाठी 70 हजार पेक्षा जास्त मुलांचा तज्ञांनी अभ्यास केला.

59

संशोधनानुसार पॅरासेटामोल (Paracetamol) खाणाऱ्या गर्भवती महिलेच्या मुलाचं मानसिक आरोग्य बिघडतं. अभ्यासानुसार 19 टक्के मुलांना ऑटिस्टिक स्पेक्ट्रम कंडीशनचा त्रास झालाय. तर, 21 टक्के मुलांमध्ये ADHDची लक्षणं पाहायला मिळाली आहेत.

69

गर्भवतीने अगदी आवश्यक असेल तेव्हाच डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणतंही औषध घ्यावं. कारण पॅरासेटामोल सारखं औषध घेतल्यामुळे बाळाचं मानसिक आरोग्य बिघडतं. मुलांमध्ये चिडचिडपणा, लक्ष केंद्रित करता न येणं, गोष्टी विसरणं असे त्रास दिसतात.

79

शरीरात हार्मोनल बदल होत असल्यामुळे महिलांचे मूड स्विंग्ज देखील होत असतात डोकेदुखी सारखा त्रास होत असतो. अशा वेळी गोळी घेण्यापेक्षा थोडीशी झोप घ्यावी.

89

गोळ्या खाण्याचे वेळ येऊ नये यासाठी काळजी घ्यावी. या काळामध्ये शरीर हायड्रेट ठेवायला हवं यासाठी वेळोवेळी पाणी पित राहणं आवश्यक आहे.

99

कॉफीचं जास्त घेणं, धूम्रपान टाळावं. मानसिक आणि शारीरिक शांततेसाठी व्यायामाकडे लक्ष द्यावं.

  • FIRST PUBLISHED :