NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / शरीरातील या छोट्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

शरीरातील या छोट्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

सगळं व्यवस्थित सुरू आहे असं वाटत असताना शरीरात काही बदल व्हायला सुरुवात होते. तेव्हाच आरोग्याचे काही प्रश्न उद्भवू शकतात. अशाच काही बदलांबद्दल पाहा.

  • -MIN READ

    Last Updated: November 15, 2019, 14:05 IST
19

सगळं व्यवस्थित सुरू असताना शरीरात काही बदल व्हायला सुरुवात होते. तेव्हाच आरोग्याचे काही प्रश्न उद्भवू शकतात. अशाच काही बदलांबद्दल पाहा.

29

डोळे पिवळे होणं - डोळ्यांमधला पांढरा भाग हा शुभ्र असणं हे आरोग्यदायी लक्षण आहे. तो भाग लाल झाला तर झोप पूर्ण न होण्याचं लक्षण आहे. पण जर तो भाग पिवळा झाला, तर काळजी करण्यासारखं आहे. ते पित्ताशयाचं दुखणं असू शकतं.

39

मानेवरची सूज - सूज असेल तर थायराॅइडची समस्या असू शकते. किंवा इन्फेक्शनही असू शकतं. असं काही झालं तर लगेच डाॅक्टरांशी संपर्क साधा.

49

पाय थंड पडणं - पाय थंड पडत असतील तर हृदयाची समस्या असू शकते. ऑटोइम्यून डिसऑर्डर Reynoldsमध्ये रक्तवाहिन्या संकुचित होतात.हात आणि पाय थंड आणि पिवळे होत असतील तर धोक्याची घंटा असू शकते.

59

तीळ - शरीरावरचा तीळ हे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. पण तोच तीळ मोठा झाला तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

69

केस गळणं - एरवी प्रत्येकाचेच 100 केस गळतात. पण त्यापेक्षा जास्त केस गळायला लागले तर थायराॅइडची समस्या असू शकते. लगेच डाॅक्टरांना भेटा.

79

नखांमध्ये बदल - नखं हा आरोग्याचा आरसा असतो. अचानक नखांचा रंग बदलला किंवा नखं तुटायला लागली की समजा शरीरात काही बिघाड झालाय.

89

केस लवकर पांढरे होणं - चाळीशीच्या आधीच केस पांढरे झाले तर समजावं डायबेटिस असू शकतो.

99

ओठ फाटणे - ओठाची त्वचा फाटत असेल तर शरीरातलं पाणी कमी झालंय किंवा व्हिटॅमिनची कमतरता आहे. ओठ नेहमीच फाटलेले राहात असतील तर फंगल इन्फेक्शन असू शकतं.

  • FIRST PUBLISHED :