दिवाळी, सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि सुख घेऊन येते. या सणाला तुम्ही तुमचे सौंदर्य आणखी वाढवू शकता. मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून तुम्ही मेकअप आणि लुकसाठीच्या आयडिया घेऊ शकता.
अभिनेत्री तेजश्री प्रधानचा हा रॉयल आणि पारंपरिक लुक तुम्हाला नक्कीच आवडेल. काठपदर साडी, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि हेवी ज्वेलरी तुमचे सौदर्य आणखी वाढवेल. फोटो क्रेडिट : तेजश्री प्रधान इंस्टाग्राम
पूजा सावंतचा हा सिंबल आणि परिपूर्ण लुक तुम्ही सहज ट्राय करू शकता. साध्या काठपदर साडीसोबत मंगळसूत्र, एक हार आणि अंबाडा तुमचे सौदर्य खुलवेल. फोटो क्रेडिट : पूजा सावंत
ऋती मराठेचा हा लुक तुम्ही सहज ट्राय करू शकता. काठपदर साडी, स्लिवलेस ब्लाऊड, फ्लोइंग पल्लू आणि त्यासोहबत एक नाजूक चोकर तुमच्या सौदर्यात भर घालेल. फोटो क्रेडिट : श्रुती मराठे
वटपौर्णिमेसाठी तुम्ही स्पृहा जोशीसारख्या तयार होऊ शकता. या फोटोत पारंपारिक नऊवारी आणि साधी मोत्यांची ज्वेलरी तुमच्या सौदर्यात भर घालेल.फोटो क्रेडिट : स्पृहा जोशी
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हा पारंपरिक नऊवारी आणि अंबाडा घातलेला हा लुक तुम्हाला आवडेल. चंद्रकोर आणि पारंपारिक दागिण्यांचा हा लुक अतिषय आकर्षक दिसतो.फोटो क्रेडिट : सोनाली कुलकर्णी
या सणाला तुम्ही अमृताचा हा साधा आणि तरीही सुंदर असलेला लुक ट्राय करू शकता. सिल्वर वर्क असलेल्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट बोटनेक ब्लाऊज आणि मोत्यांची ज्वेलरीने हा लुक परिपूर्ण होईल.फोटो क्रेडिट : अमृता खानविलकर
दिवाळीसाठी तुम्ही मृण्मयीचा हा लुक देखील ट्राय करू शकता. खणाच्या साडीसोबत स्लिवलेस ब्लाऊज आणि सिंपल ज्वेलरी तुम्हाला खुलून दिसेल.फोटो क्रेडिट : मृण्मयी देशपांडे