या दिवाळीत भरभरून खरेदी करण्यासारखं तुमचं बजेट नसेल तर चिंता करण्याचं काही कारण नाही. आम्ही तुम्हाला अशा काही शॉपिंग साइटबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही स्वस्तात फॅशन अॅक्सेसरीजपासून किचन सेटपर्यंत सर्वच गोष्टींची मनपसंत शॉपिंग करू शकता. विशेष म्हणजे खरेदी केल्यावर तुम्हाला कॅशबॅकची ऑफरही मिळू शकते.
पेटीएम मॉल- भारतातील विश्वसनीय ऑनलाइन शॉपिंग अॅप म्हणून पेटीएमकडे पाहिलं जातं. इथे तुम्हाला शॉपिंगवर मोठ्या प्रमाणात सूट आणि कॅशबॅक मिळू शकतं. विशेष म्हणजे इथे तुम्ही ब्रॅण्डेड गोष्टी कमी किंमतीत विकत घेऊ शकता.
अॅमेझॉन- दरवर्षी दिवाळीला अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल येतो. या सेलमध्ये तुम्ही मोठ्या डिस्काउंटसह मोबाइलपासून घरगुती वस्तू विकत घेऊ शकता. तुम्ही टीव्ही, फ्रीजपासून लॅपटॉप कमी किंमतीत विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे या अॅपवरही तुम्हाला सूट आणि कॅशबॅक मिळेल.
फ्लिपकार्ट- दरवर्षी इथेही दिवाळी सेल असतो. इथे बंपर सूट मिळते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तुम्ही इथून स्मार्टफोन, लॅपटॉप आणि अन्य सामान कमीत कमी किंमतीत घेऊ शकता. डिस्काउंटमुळे मोठ्या शॉपिंगवर तुमचे हजारो रुपये वाचू शकतात.
मिन्त्रा- जर तुम्हालाही ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते तर मिन्त्रावरून तुम्ही दिवाळीसाठी मनोसोक्त शॉपिंग करू शकता. या अॅपवरही तुम्हाला सूट आणि कॅशबॅक मिळेल.