मी नसेल आई दिवा वंशाचा, मी आहे दिव्यातील वात, नाव चालवेन कुळाचे बाबा, मोठी होऊनी जगात.
लेक म्हणजे ईश्वराची देणं, लेक म्हणजे अमृताचे बोल, तिच्या पाऊलखुणांनी, सुख ही होई अनमोल.
छोटी छकुली अशी असावी प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी.
सुगंध, प्रेम आणि मुली, हे जिथले असतात तिथे थांबत नाहीत. त्यामुळे मुलींवर भरपूर प्रेम करा आणि त्यांच्या सहवासाचा सुगंध दरवळत राहू द्या.
एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.