कोरोनाव्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.
कोरोनाव्हायरसंबंधित बातम्या तुम्ही वाचता, मात्र सर्वच बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
घरात एकटे राहू नका. इतरांपासून वेगळे राहत असलात तरी फोन, व्हिडीओ कॉल, सोशल मीडियावर सर्वांशी संपर्कात राहा.
घरातल्या घरात शक्य असा हलका व्यायाम करा, मेडिटेशन, योगा करा.
सोशल मीडियावर खूप अफवा पसरतात, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. शक्यतो सोशल मीडियापासून दूर राहा.