कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. मात्र यामुळे स्ट्रेस इटिंगची समस्या वाढत आहे.
घरातून काम करताना वाढत्या ताणामुळे अनेक जण भरपूर खात आहे, तर काहींना भूकच लागत नाही. खाण्यापिण्याच्या वेळाही अनियमित आहेत.
स्ट्रेस इटिंगवेळी बहुतेक लोकं जंक फूड, गोड पदार्थ यासारख्या पदार्थांचं सेवन जास्त करतात. अशा पदार्थांमुळे ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि वजनवाढीची समस्या बळावते. भूक शमत नाही, तर अधिक लागते.
स्ट्रेस इटिंगपासून वाचण्यासाठी अशा ठिकाणी काम करा, जिथं खाण्यापिण्याचे पदार्थ विशेषत: जंकफूड तुमच्या नजरेस पडणार नाहीत.
घरातून काम करताना तुमचा दिनक्रम पूर्वीप्रमाणेच सुरळीत ठेवा.
आवश्यक त्या वेळेला हेल्दी पदार्थ खा. खाताना टिव्ही पाहू नका, मोबाइलमध्ये गुंतू नका. पूर्ण मन खाण्यात असावं. यामुळे पोट भरेल आणि वारंवार भूकही लागणार नाही.
काम करताना भूक लागल्यासारखं वाटलंच तर सुकामेवा खा.