NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / जगातील सर्वात हेल्दी देशही 'कोरोना'च्या विळख्यात, व्हायरसमुळे झाले बेजार

जगातील सर्वात हेल्दी देशही 'कोरोना'च्या विळख्यात, व्हायरसमुळे झाले बेजार

Bloomberg Healthiest Country Index अनेक निकषांवर हेल्दी देशांची (Healthy country) यादी तयार करतं. या यादीत सर्वात उच्च स्थानावर असलेल्या देशांनाही कोरोनाव्हायरसने (Coronavirus) विळखा घातला आहे.

15

स्पेन हा जगातील सर्वात हेल्दी असा देश आहे, जो पहिल्या क्रमांकावर आहे. या देशात मद्यपान, धूम्रपान आणि नाइट लाइफ असते, तरीदेखील इथली लोकं भरपूर वर्षं जगतात. कारण ते निरोगी जीवनशैलीचाही अवलंब करतात. असा हा सर्वात हेल्दी देश कोरोनाव्हायरस पसरलेल्या देशांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे.

25

हेल्थ इंडेक्समध्ये इटली दुसऱ्या क्रमांकाचा हेल्दी देश आहे. इटलीतील लोकांची जीनवशैली हेल्दी मानली जाते. इथं Mediterranean diet ला प्राधान्य दिलं जातं, जे हृदयासाठी फायदेशीर असतं. मात्र इटलीमध्ये कोरोनाव्हायरसची 7,375 प्रकरणं आहेत आणि 366 मृत्यू झालेत. कोरोनाव्हायरसमुळे चीननंतर सर्वाधिक मृत्यू या देशात झालेत.

35

हेल्दी देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आइसलँड मात्र इथंही कोरोनाव्हायरसची 58 प्रकरणं आहेत. इथंदेखील Mediterranean diet ला प्राधान्य दिलं जातं. शिवाय वय आणि जेंडरनुसार इथं स्पोर्ट अक्टिव्हिटीही वेगवेगळ्या असतात.

45

जपान हेल्दी देशांच्या यादीत चौथा आहे. या देशाचा आहारा सर्वात हेल्दी मानला जातो. इतर विकसित देशांच्या तुलनेत इथली बहुतेक लोकं घरात बनवलेले अन्नपदार्थच खातात. आरामात बसून खाणं, भरपूर चालणं हे या लोकांच्या चांगल्या आरोग्याचं रहस्य. तरीही या देशात कोरोनाव्हायर रुग्णांची संख्या 502 आहे.

55

नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंड या देशातील लोकं हेल्दी आहेत कारण ते डोंगर चढतात. त्यांची घरं उंचावरच असतात, जिथं ते पायी चालत जातात. मात्र हेल्दी देशाप्रमाणे कोरोनाव्हायरसच्या संक्रमित देशांच्या यादीतही हा देश जपानच्या पाठोपाठ आहे. याठिकाणी कोरोनाव्हायरसचे 332 प्रकरणं आहेत, तर 2 मृत्यू झालेत.

  • FIRST PUBLISHED :