कोरोनरी हार्ट डिसीज - हा हृदयाचा आजार आहे, ज्यामध्ये हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हृदयासंबंधी आजारामुळे दरवर्षी दीड कोटींपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. WHO च्या मते, गेल्या 15 वर्षांपासून हा आजार सर्वाधिक मृत्यूंचं प्रमुख कारण आहे.
कॅन्सर - जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार 2016 साली फुफ्फुस कॅन्सरमुळे 17 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. लॅन्सेटचा 2019 सालचा रिपोर्ट आणि कार्डिओलॉजीच्या युरोपियन सोसायटीच्या 2019 सालच्या परिषदेत मांडण्यात आलेल्या माहितीनुसार जास्त उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कॅन्सर सर्वाधिक मृत्यूचं कारण ठरतो आहे. तर मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हृदयासंबंधी आजार सर्वाधिक जीवघेणे आहेत.
सीओपीडी - क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी डिसीजमुळे 30 लाख लोकं जीव गमावतात.
डायबेटिज - दरवर्षी 15 ते 16 लाख लोकांचा मृत्यू डायबेटिजमुळे होतो. विकसनशील देशात याचं प्रमाण खूप आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं अशा जीवघेण्या 10 इतर आजारांची सूची जारी केली आहे. ज्यामध्ये श्वसनसंबंधी संसर्ग, डायरिया, टीबी, अल्झाइमर, डिमेन्शिया यांचा समावेश आहे.