NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / फक्त 250 रुपयांत घरीच करा कोरोना टेस्ट; Home testing पूर्वी वाचा ICMR ची Advisory

फक्त 250 रुपयांत घरीच करा कोरोना टेस्ट; Home testing पूर्वी वाचा ICMR ची Advisory

ICMR ने Coviself या कोरोनाच्या होम टेस्टिंग किटला मंजुरी दिलेली आहे.

110

लोकांना घरच्या घरी स्वतःची कोरोना चाचणी करता येईल अशा RAT टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) मंजुरी दिली आहे.

210

COVISELF असं या किटचं नाव आहे. पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेडने ही टेस्ट किट (My Lab Discovery solution Ltd.) तयार केली आहे.

310

फक्त 250 रुपयांत मेडिकल शॉपवर ही टेस्ट किट उपलब्ध होईल. हे टेस्ट किट कसं वापरावं याबाबत आयसीएमआरने सूचना जारी केल्या आहेत.

410

केमिस्ट शॉपमधूनच COVISELF टेस्ट कीट विकत घ्या, असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.

510

COVISELF मोबाईल अॅप डाऊनलोड करा आणि त्यावर नोंदणी करा.

610

टेस्ट कशी करायची याबाबतची संपूर्ण माहिती युझर मॅन्युअलमध्ये नीट वाचा.

710

COVISELF किटमधील स्टिक वापरून नाकातील स्वॅब घ्यायचे आहेत. ते या किटमधील एका छोट्याशा बाटलीत ठेवायचं आहे.

810

त्यानंतर प्रेग्नन्सी किटमधील स्ट्रिपप्रमाणे एक स्ट्रिप देण्यात आली आहे, त्यावर या स्वॅबचे नमुने टाकावेत.

910

ज्या मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड करण्यात आलं आहे, त्याच मोबाईलवर टेस्ट स्ट्रिपचा फोटा काढायचा. हा डेटा थेट आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टल स्टोअरवर जाईल. रुग्णाच्या गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल.

1010

मोबाईल अॅपमार्फत तुम्हाला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचा रिपोर्ट मिळेल.

  • FIRST PUBLISHED :