मोसम बदलत असतो. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. नंतर पावसाळा. बदलत्या ऋतुमानानुसार शरीरात बदल होतात. ऋतू बदलला की शरीरात आळस येतो. ते दुखायला लागतं.
ऋतूमान बदललं की शरीरात सांधेदुखी सुरू होते. याचं कारण शरीरात आणि मेंदूत barometric प्रेशर वाढतं. त्यामुळे दुखणं शरीरात जाणवायला लागतं.
अनेकदा अगोदर कुठे मार लागला असेल तर ऋतुबदलाच्या वेळी ते जास्त जाणवतं.
मोसम बदलला की ब्लडप्रेशरही वाढतं. हृदयानं तयार केलेल्या प्रेशरवर काम करतं. हृदयाचं प्रेशर बाहेरील हवेवर अवलंबून असतं.
अनेकदा थंडी वाढली की लोकांना उदास वाटायला लागतं. त्याला Seasonal Affective Disorder म्हणतात.
सीझनल डिसआॅर्डरमध्ये melatonin हॉर्मोन लेव्हल वाढते. serotonin हॉर्मोन लेव्हल कमी होते. यामुळे झोप येते. उदास वाटतं.
मोसम बदलला की मेंदूतल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.त्यानं डोकं दुखायला लागतात.