लहान मुलं आणि मोठ्या माणसांमध्ये डिप्रेशन येण्याचं कारण आणि डिप्रेशनची लक्षणं वेगवेगळी असतात.
शाळेत इतर मुलांकडून त्रास, अभ्यासाचा ताण यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये येऊ शकतात.
नवीन घर, नवी शाळा, पालक विभक्त होणे, घरात भांडणं अशा परिस्थितीचा मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. जीवनशैलीतील बदल मुलं लवकर स्वीकारू शकत नाहीत आणि त्यामळे डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात.
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन झालेलं असेल तर त्या घरातील मुलांना डिप्रेशनचा धोका जास्त असतो. (फोटो - Shutterstock)
मुलांच्या शरीरात हार्मोन्स अनियंत्रित होणे किंवा त्यामध्ये बदल होणे यामुळेदेखील डिप्रेशन येऊ शकतं.
मुलं दुखी, निराश आणि चिडचिडी होणं, कुणाशीच न बोलणं, कोणत्या कामात मन न लागणं, भीती वाटणं, भूक मंदावणं, झोप कमी लागणं, लक्ष केंद्रीत न होणं, थकवा, पोटदुखी आणि डोकेदुखी ही मुलांमधील डिप्रेशनची लक्षणं आहेत. मुलांमध्ये असे बदल दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.