तुम्ही अशी अनेक माणसं पाहिली असतील जी छोट्या छोट्या गोष्टींचीही सतत तक्रार करत असतात. चाणक्यच्यामते, सतत तक्रारी करणारी माणसं ही फार मुर्ख असतात.
बुद्धिमान आणि हुशार माणसांमध्ये तुम्हाला हा गुण कधीच दिसणार नाही. अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या बुद्धिमान माणसांमध्ये कधीच दिसत नाहीत ते जाणून घेऊ.
बुद्धिमान माणूस कधीही त्याच्या आई- वडिलांबद्दल तक्रार करत नाही. कारण त्याला याची पूर्ण जाणीव असते की ते जे काही आहेत ते फक्त आई- वडिलांमुळेच आहेत. आई- वडिलांची त्यांच्याप्रती कितीही वाईट वागणूक असली तरी त्यांचा मान कधीही कमी होऊ शकत नाही.
एक बुद्धिमान माणूस कधीही दुसऱ्यासमोर त्याच्या पत्नीबद्दल वाईट बोलत नाही. कारण त्याला याची पूर्ण कल्पना असते की पत्नी ही घरचा मान आहे आणि घरची इज्जत अशी चारचौघात कोणीही घालवत नाही.
तसेच बुद्धिमान माणूस कधीही त्याचा कमकुवतपणा दुसऱ्यांना सागत नाही. कारण त्याला हे माहीत असतं की, जर दुसऱ्याने त्याचा कमकुवतपणा जाणला तर त्याच्यासाठीच ते नुकसानकारक असेल.