NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कोरोनामुळे बाळाला दूध पाजणं थांबवू नका; Corona positive मातांसाठी राज्य सरकारच्या गाइडलाइन्स

कोरोनामुळे बाळाला दूध पाजणं थांबवू नका; Corona positive मातांसाठी राज्य सरकारच्या गाइडलाइन्स

कोरोना प़ॉझिटिव्ह मातांनी बाळाला दूध पाजताना काय खबरदारी घ्यावी?

18

आईचं दूध म्हणजे बाळासाठी रोग प्रतिकारक शक्ती देतं. त्यामुळे बाळासाठी आईचं दूध खूप महत्त्वाचं आहे. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची असताना अनेक बाळांना आईचं दूध मिळत नाही आहे.

28

एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तिला आयोसोलेट केलं जातं. ती व्यक्ती बरी होईपर्यंत तिच्या संपर्कात कुणी येत नाही. अशाच जर ती व्यक्ती बाळाला दूध पाजणारी आई असेल, तर मग बाळाला दूध पाजणं अशक्य होतं.

38

पण कोरोनासारखी लक्षणं असतील किंवा कोरोना असेल आणि आईला आपल्या बाळाला दूध पाजायचं असेल तर ती आवश्यक ती खबरदारी घेऊन आपल्या बाळाला दूध पाजू शकते.

48

कोरोना पॉझिटिव्ह आईने बाळाला दूध पाजताना काय काळजी घ्यावी याबाबत जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारनेही गाइडलाइन्स जारी केलेल्या आहेत.

58

बाळाला दूध पाजताना मास्क घाला. एकदा वापरलेला मास्क पुन्हा वापरू नका.

68

बाळाला दूध पाजण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा किंवा हातांना सॅनिटाइझर लावा.

78

खोकताना, शिंकताना रूमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा. टिश्यू पेपर लगेच डिस्पोज करा.

88

जर कोरोनामुळे किंवा त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आई आपल्या बाळाला दूध पाजू शकत नसेल, तर बाळाला दुसऱ्या आईचं दूध द्यावं.

  • FIRST PUBLISHED :