मजबूत हाडांसाठी तुमच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. कारण हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. हाडांसाठी कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं.
ओमेगा-3 फॅट्सचे पदार्थ खायला हवे. यामुळे हाडेही मजबूत होतात. हाडांच्या चांगल्या वाढीसाठी ओमेगा-3 फॅट्स आवश्यक असल्यानं विशेषत: लहान मुलांच्या आहारात त्याचा समावेश हवा.
हाडे मजबूत करण्यासाठी हिरव्या भाज्यांचेही मोठे योगदान असते. जर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश केला तर तुमची हाडे वेळेआधी कमकुवत होणार नाहीत.
हाडे मजबूत करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे हाडे मजबूत राहतात. चालणे, धावणे यासारखे सोपे व्यायाम करणेही फायदेशीर आहे.