बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. सोनाक्षी सिन्हाने आपले काही एक्सरसाईझचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती अतिशय सडपातळ दिसत आहे.
सोनाक्षी सिन्हा सध्या कोरोना परिस्थितीमध्ये घरीच आहे. बरेच दिवस ती चित्रपटांपासूनही दूर आहे.
सोनाक्षी सिन्हाने या फावल्या वेळेचा अगदी योग्य उपयोग करत आपलं वजन घटवलं आहे.
सोनाक्षी सिन्हाचा हा नवा लुक पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर चाहत्यांनाकडून या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतं आहे.
बॉलिवूडमध्ये येण्याआधी सोनाक्षी सिन्हाचं वजन खूपच जास्त होतं हे सर्वांनाच माहिती आहे.
बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सोनाक्षी सिन्हाने आपलं 30 किलो वजन कमी केलं होतं.
सोनाक्षी सिन्हाने दबंग या चित्रपटातून सलमान खानसोबत आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती.
सोनाक्षी सिन्हा नेहमीच आपल्या बोलक्या आणि बिनधास्त स्वभावाने ओळखली जाते.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील अभिनयाचे गुण पुरेपूर सोनाक्षी सिन्हात उतरलेले दिसतात.
सोनाक्षी सध्या आपला नवा लुक एन्जॉय करत आहे आणि तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठी पसंतीदेखील मिळत आहे.