NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Immune Booster Foods: मुलांची रोगप्रतिकारकशक्ती बनेल स्ट्राँग; या पदार्थांचा आहारात करा समावेश

Immune Booster Foods: मुलांची रोगप्रतिकारकशक्ती बनेल स्ट्राँग; या पदार्थांचा आहारात करा समावेश

Best Immune Booster Foods For Kids : पावसाळा सुरू झाला असून बदलत्या हवामानाचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होताना दिसतो. या दिवसांत मुलांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते. हवामानात थोडासा बदल झाला तर मुले अस्वस्थ होतात. पावसाळा सुरू झाला की, सर्दी, खोकला, तापाचा त्रास वाढतो. प्रत्येक आई-वडील मुलाला हंगामी फ्लूपासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलाला सतत खोकला, सर्दी, ताप येत असेल, तर तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा महत्त्वाचा उपाय आहे. मुलांच्या आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश केला तर तुमच्या मुलाला आजार आणि कोणत्याही प्रकारचे संसर्ग टाळण्यास खूप मदत होईल.

18

लिंबूवर्गीय फळे वास्तविक लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम त्यामुळे होते. यासाठी द्राक्षे, लिंबू, संत्री, बेरी, पेरू इत्यादी फळे मुलांना नाश्त्यात द्यायला हवीत.

28

दही - दही हे एक प्रोबायोटिक अन्न आहे, जे आतड्यात असलेले चांगले बॅक्टेरिया मजबूत करण्यास मदत करते. हे पचनसंस्थेसाठीही चांगले असते. लहान मुलांना जेवणासोबत दही दिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहते.

38

हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्यांमध्ये फॉलिक अॅसिड आणि लोह मुबलक प्रमाणात असते आणि त्यात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के आढळतात. मुलांच्या आहारात मेथी, पालक इत्यादी भाज्यांचा समावेश जरूर करावा.

48

ड्रायफ्रूट्स- ड्रायफ्रूट्समध्ये झिंक, लोह, व्हिटॅमिन-ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. कोणत्याही प्रकारचे संक्रमण वाढण्यापासून रोखण्यासाठी त्याचा फायदा होतो. अशा स्थितीत मुलांना सकाळी लवकर सुका मेवा खायला द्यावा.

58

नारळ पाणी - नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगले असतात. यासाठी तुम्ही मुलांना नारळ पाणी देऊ शकता.

68

अंडी - मुलाला रोज एक अंडे खायला दिले तर त्याच्या शरीरातील प्रथिनांचे प्रमाण चांगले राहील आणि अनेक आजार दूर राहतील. मुलाला उकडलेले अंडे अधिक फायदेशीर होईल.

78

मासे - जर तुम्ही मुलाला मासे दिले तर ते त्यांच्या शरीरातील ओमेगा 3 फॅटी ऍसिडची गरज सहज पूर्ण होईल आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.

88

मांस - जेवणात मांस किंवा कोंबडी दिल्यास शरीरात झिंक, लोह, प्रथिने इत्यादींचा पुरवठा होतो आणि मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :