NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Period Pain Relief : एक ग्लास पाणी आणि...; मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी काही मिनिटात होईल बंद!

Period Pain Relief : एक ग्लास पाणी आणि...; मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी काही मिनिटात होईल बंद!

मासिक पाळीच्या दिवसात महिलांना पोटदुखी, पाठदुखी, चिडचिड, मायग्रेन अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही महिलांना या वेदना खूप कमी प्रमाणात जाणवतात, तर काही महिलांना मासिक पाळी दरम्यान असह्य करणाऱ्या वेदना होतात. अशावेळी महिला अनेक गोळ्या औषधांचे सेवन करतात, पण यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा आज तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यांचा महिलेने पाळीच्या दिवसातील आहारात समावेश केला तर तिला नक्कीच आराम मिळू शकतो.

15

आलं : तज्ञांच्या म्हणण्यानुसार मासिक पाळी दरम्यान दररोज कोमट आल्याचे पाणी प्यायल्याने वेदना, सूज , क्रॅम्प्स येण्यापासून आराम मिळतो. आल्याचे पाणी मासिक पाळीच्या दिवसात प्रभावी ठरू शकते.

25

अननस : अननसमध्ये ब्रोमेलेन एंजाइम असते जे मासिक पाळीच्या दरम्यान ब्लोटिंग आणि ओटीपोटात क्रॅम्पच्या समस्यांशी लढा देऊन आराम करण्यास मदत करते.

35

लिंबू : मासिक पाळीच्या काळात अनेक वेळा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. तेव्हा, लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड अन्नातील लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे या काळात लिंबाचे सेवन केल्याने चिडचिडेपणा आणि मूड स्विंग यांसारख्या समस्याही टाळता येतात.

45

कलिंगड : कलिंगडमध्ये लाइकोपीन नावाचे प्लांट कंपाउंड असते, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते. या काळात टरबूज खाल्ल्याने हाता-पायांची सूज कमी होते.

55

बीट : मासिक पाळीत रक्तस्त्राव झाल्यास स्त्रीच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. त्यामुळे महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता होते आणि शरीर सुस्त होऊ लागते. तेव्हा आहारात बीटचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता तर दूर होतेच पण शरीरातील ऊर्जा पातळी राखण्यासही मदत होते.

  • FIRST PUBLISHED :