NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / 60 व्या वर्षी ही दिसायचंय तरुण, मग रोज खा 'हा' पदार्थ, त्वचा राहील हेल्दी आणि चमकदार

60 व्या वर्षी ही दिसायचंय तरुण, मग रोज खा 'हा' पदार्थ, त्वचा राहील हेल्दी आणि चमकदार

सुका मेवा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. याच प्रकारात मोडणारा पदार्थ म्हणजे 'मखाना'. अनेक प्रकारची मूलद्रव्ये आणि अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असलेला मखान्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तेव्हा दररोज मखाना खाण्याचे 5 फायदे जाणून घेऊयात.

15

निरोगी त्वचा : मखनामध्ये अनेक पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच मखाना मध्ये अनेक अमीनो ऍसिड देखील असतात जे वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. यामध्ये ग्लूटामाइन, सिस्टीन, आर्जिनिन आणि मेथिओनाइन यांचा समावेश आहे. रोज माखणा खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. त्वचेवरील सुरकुत्या यामुळे निघून जातात आणि त्वचा चमकदार होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या त्याच्या वापराने नाहीशा होतात.

25

हृदयासाठी फायदेशीर : मखाने हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. मखान्यांमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. याच्या नियमित सेवनानेही रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

35

डायबिटीज कंट्रोल करते : दररोज रिकाम्या पोटी मखान्याचे सेवन केल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये येतो. त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी मखान्याचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते.

45

वजन कमी करण्यावर प्रभावी : मखानाचे दररोज सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच वजन कमी करायचे असल्यास दररोज रिकाम्या पोटी मखाने खायला हवे यामध्ये असलेले गुणधर्म वेट लॉससाठी उपयुक्त ठरतात. याचे सेवन केल्याने दिवसभर भूक कमी लागते आणि शरीरात असणारी पोषक तत्वांची कमतरता दूर होते.

55

पचनक्रिया चांगली राहाते : मखानामध्ये फायबर, कॅल्शियम, आयर्न फॉस्फरससह अनेक पोषक तत्वे असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराला बळकटी देण्यासाठी हे उपयुक्त असतात. याच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते.

  • FIRST PUBLISHED :