सहसा दसऱ्यानंतर लगेच दिवाळीची तयारीही बहुतेक घरांमध्ये सुरू होते. या दरम्यान अनेक लोक घराची साफसफाई आणि घर सजवण्याच्या धडपडीत व्यस्त होतात.
दिवाळीत लोक घराला रंग देतात. मात्र रंग न देता फक्त साफसफाई करून आणि सजावट करून तुम्ही घर आकर्षक बनवू शकतात. तेही अगदी कमीत कमी वस्तूंमध्ये.
सर्वात आधी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावा. यासाठी तुम्ही ताज्या फुलांचं किंवा आर्टिफिशिअर तोरणही लावू शकता.
घराला उत्तम लूक देण्यासाठी तुम्ही घराच्या भिंती, खिडक्या आणि दारांना लायटिंगदेखील लावू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या लायटिंगने तुमचे घर खूपच आकर्षक दिसेल. (Image - Canva)
फुलांनी घर सजावल्याने घर सुंदरही दिसेल आणि घरामध्ये एक छान सुगंधही दरवळेल. ताज्या फुलासोबतच तुम्ही कृत्रिम फुलांची मदत घेऊ शकता. या फुलांचा तुम्ही पुन्हा वापर करू शकाल.
घराचे मुख्य गेट आणि अंगण आकर्षक करण्यासाठी तुम्ही रांगोळी देखील काढू शकता. रंगीबेरंगी किंवा फुलांनी सुंदर रांगोळी बनवण्यासोबतच या रांगोळीला तुम्ही दिव्यांनीही सजवू शकतात.
घराचे मुख्य दार सजवल्यानंतर अंगणात किंवा घराच्या वरच्या बाजूला आकाशदिवे लावा. हल्ली बाजारात खूप सुंदर आकाशदिवे मिळतात किंवा तुम्ही मुलांसोबत मिळून घरीच ते बनवूही शकता.
दिवाळीला दिव्यांचे महत्व असते. घर उजळून टाकण्यासाठी दिव्यांचा वापर उत्तम ठरू शकते. यामुळे तुमचे संपूर्ण घर तर उजळून निघेलच, पण घराची सजावटही खूप चमकेल. (Image - Canva)
घर सजवण्यासाठी तुम्ही मेणबत्त्या आणि मातीची भांडी देखील वापरू शकता. ड्रॉईंग रूमपासून खिडकीपर्यंत सुंदर भांडी ठेवून तुम्ही घराची सजावट वाढवू शकता. (Image - Canva)
दसऱ्याच्या दिवशी घराला वेगळा लुक देण्यासाठी तुम्ही रंगीबेरंगी फ्लॉवर स्कर्ट्सही लावू शकता. तुमच्या घराच्या भिंतींवर लिली आणि गुलाबाची फुले खूप छान दिसतील. (Image - Canva)