NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / 24 व्या वर्षी कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन; लक्षणांकडे दुर्लक्ष करणे बेतू शकते जीवावर

24 व्या वर्षी कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन; लक्षणांकडे दुर्लक्ष करणे बेतू शकते जीवावर

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा यांचे रविवारी 20 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

16

बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री एंड्रिला शर्मा यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एंड्रिला फक्त 24 वर्षांची होती. 15 नोव्हेंबर रोजी एंड्रिलाला मल्टिपल कार्डियाक अरेस्ट आला असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडच्या काळात ह्याचं प्रमाण वाढलं आहे. काय आहे यामागची कारणं? कार्डिअ‍ॅक अरेस्ट येण्याआधी कोणती लक्षणं दिसतात?

26

कार्डियक अरेस्ट हा हृदयविकारापेक्षा वेगळा असतो. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदयाच्या एका भागापर्यंत रक्त पोहोचणे थांबते तर कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक काम करणे बंद करते. हृदयविकाराचा झटका कधीकधी इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये अडथळा आणू शकतो ज्यामुळे अचानक कार्डिअ‍ॅक अरेस्ट येतो.

36

जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा श्वास घेण्यास खूप त्रास होतो आणि माणूस बेशुद्ध होतो. हे हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये अडथळ्यामुळे होते. यामुळे हृदयाच्या पंपिंग क्रियेत व्यत्यय येतो आणि शरीरातील रक्तप्रवाह थांबतो.

46

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा घटना साधारणपणे वयाच्या 35-40 व्या वर्षीही पाहायला मिळतात. पण आता तरुणांमध्येही या आजाराचा धोका खूप वाढला आहे. अशा परिस्थितीत, ही कारणे कार्डिअ‍ॅक अरेस्टसाठी जबाबदार आहेत.

56

धूम्रपान, 2. खराब कोलेस्टेरॉल, 3. उच्च रक्तदाब, 4. मधुमेह, 5. मानसिक आणि सामाजिक ताण, 6. व्यायामाचा अभाव, 7. लठ्ठपणा, 8. भाज्या आणि फळे कमी खाणे, 9. जास्त प्रमाणात मद्यपान करणे.

66

कार्डिअ‍ॅक अरेस्टच्या आधी शरीरात ही लक्षणे दिसतात. बेशुद्ध होणे, हृदयाची धडधड वाढणे, छातीत वेदना, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलट्या होणे, पोट आणि छातीत दुखणे.

  • FIRST PUBLISHED :