मुरताळचे ढाबे त्यांच्या पराठ्यांसाठी देशभर प्रसिद्ध आहेत, आता या गल्ल्यांमध्ये रॉयल ढाबा नावाचा नवा ढाबा सुरू झाला आहे.
या ढाब्याचे वैशिष्ट्य म्हणजे ढाब्याच्या मालकाचे त्याच्या येतेच भारतातील सर्वात मोठा पराठा बनतो असा दावा केला आहे.
हा पराठा बनवण्यासाठी 2 किलो पीठ, 600 ते 700 ग्रॅम कांदे किंवा बटाटे मिसळले जातात, तर येथे तीन प्रकारचे पराठे बनवले जातात, हा पराठा शुद्ध देशी तुपापासून बनवला जातो.
धाब्यावरील सोहनलाल नावाचा आचारी हा पराठा बनवतो, तसेच तीन ते चार व्यक्ती मिळून हा पराठा संपवतात.
हॉटेल मालकाने ग्राहकांना हा मोठा पराठा खाण्याचे चॅलेंज दिले आहे. या चॅलेंजनुसार जो व्यक्ती हा संपूर्ण पराठा एकट्याने 15 मिनिटांत संपवेल त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.
परंतु ढाबा मालकाच्या सांगण्यानुसार गेल्या चार वर्षात हे पराठा चॅलेंज कोणीही जिंकू शकलेलं नाही.