NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Hair Fall Home Remedies : केस खूपच गळतायत? मग 8 घरगुती उपाय ठरतील रामबाण

Hair Fall Home Remedies : केस खूपच गळतायत? मग 8 घरगुती उपाय ठरतील रामबाण

कामाचा स्ट्रेस, वातावरणातील धूळ आणि केसांची नीट काळजी न घेणे इत्यादींमुळे सध्या स्त्री पुरुषांना केस गळतीची समस्या उद्भवते. केस गळतीमुळे केस खूपच विरळ होतात आणि अनेकदा त्या ठिकाणी टक्कल देखील पडते. लांब सडक आणि दाट केस हे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतात. तेव्हा असे केस सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. तेव्हा केस गळतीवर आम्ही तुम्हाला सोपे 8 घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या केसांचा पोत सुधारण्यास मदत होईल.

17

केसांची गळती थांबवायची असेल तर मोहोरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सोफ्ट होतात तसेच यामुळे केसाचा पोत सुधारण्यास मदत होते.

27

कांद्यात सल्फर असल्याने त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील केसांना लावू शकता. तसेच यामुळे स्काल्प इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते.

37

नारळाचं तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांची मूळ चांगली रहातात आणि केस गळण्याची समस्या दूर होते.

47

ग्रीन टी ही एक उत्तम हेअर ग्रोथ ट्रीटमेंट आहे. तसेच हेअर फॉल कमी करण्यासाठी एलोवेरा देखील प्रभावी ठरते.

57

केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. आवळ्याची पेस्ट तुम्ही टाळूला लावू शकता किंवा मेहेंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करून ती केसांवर लावल्याने केसांची वाढ लवकर होते.

67

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे कोंड्यापासून संरक्षण होते.

77

दही आणि मध केसांना लावल्याने केस गळती कमी होऊन केसांचा पोट सुधारतो.

  • FIRST PUBLISHED :