NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / सूर्यप्रकाशाविना हिरवीगार राहतात ही 5 झाडं, घराच्या आत ठेवण्यासाठी आहेत बेस्ट ऑप्शन

सूर्यप्रकाशाविना हिरवीगार राहतात ही 5 झाडं, घराच्या आत ठेवण्यासाठी आहेत बेस्ट ऑप्शन

झाड हिरवीगार ठेवण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्यामुळे अनेक लोकांची घरात रोप लावण्याची इच्छा अपूर्ण रहाते. तेव्हा तुम्हाला अशी काही झाडे सांगणार आहोत जी सूर्यप्रकाशाशिवायही हिरवीगार रहातात आणि त्यांची चांगली वाढ देखील होते. ही झाड कमी प्रकाश वनस्पती म्हणून ओळखली जातात. त्यामुळे ही झाड तुम्ही तुमच्या घरात कमीत कमी उजेड असलेल्या ठिकाणी देखील लावू शकता, ज्यामुळे तुमच्या घराची शोभा देखील वाढते.

15

कास्ट आयर्न प्लांट: या वनस्पतीला त्याच्या गुणांमुळे हे नाव मिळाले आहे. जर तुम्हाला रोपे लावण्याचा फारसा अनुभव नसेल तर ही रोपे लावणे तुमच्यासाठी योग्य ठरेल कारण त्याची जास्त देखभाल करावी लागत नाही. तसेच, सूर्यप्रकाशाशिवायही ते सहज वाढते.

25

चिनी सदाहरित वनस्पती : ही वनस्पती ऍग्लोनेमा म्हणून ओळखली जाते. यासाठी कमीत कमी प्रकाश आवश्यक असतो त्यामुळे हे झाड तुम्ही इनडोअर लावू शकता. पण या झाडांमध्ये क्लोरीन पाणी घालू नका, अन्यथा ते कोरडे होऊ शकते. कारण या वनस्पतीला थोडेसे उबदार तापमान हवे असते.

35

फिलोडेंड्रॉन प्लांट: ही वनस्पती हवा शुद्ध करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. या फिलोडेंड्रॉन वनस्पतीच्या अनेक जाती आहेत. जेव्हा ही वनस्पती वाढू लागते तेव्हा त्याला आधाराची आवश्यकता असते, म्हणून भांड्यात एक उभे लाकूड ठेवा. जेणेकरून या वनस्पतीची योग्य वाढ होईल.

45

सिंगोनियम वनस्पती : या वनस्पतीला 'एरोहेड' असेही म्हणतात. या वनस्पतीची पाने बाणाच्या टोकासारखी असतात. आपण हे रोप कापून सहजपणे लावू शकता. ते भरपूर ऑक्सिजन देते आणि हवा शुद्ध करते. आपण ते माती किंवा पाण्यात असा दोन्हीमध्ये वाढवू शकता. तुम्ही त्याची छोटी रोपे बाटलीत किंवा फ्लॉवर पॉटमध्येही लावू शकता.

55

स्नेक प्लांट: स्नेक प्लांट ही हवा शुद्ध करण्यासाठी सर्वोत्तम वनस्पती मानली जाते. आपण ते माती किंवा पाण्यात लावू शकता. तसेच या झाडाला दररोज पाणी देण्याची गरज नसते. तुम्ही याचे रोप घरातील हव्या त्या ठिकाणी ठेऊ शकता.

  • FIRST PUBLISHED :