चहा आणि कॉफी : भरपूर प्रमाणात चहा आणि कॉफी ही नशेची सवय लावण्याची पहिली पायरी आहे. चहा आणि कॉफी हे उच्च-कॅफिनयुक्त पेय असल्याने त्याचे अतिरिक्त सेवन आरोग्यास हानी पोहोचवते. त्यामुळे अश्या पेयांचे वारंवार सेवन केल्याने निकोटीनची लालसा निर्माण होते आणि त्यामुळे ठरवून देखील धूम्रपान सोडता येत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सिगारेट किंवा तंबाखू सोडायची असेल तर तुम्ही चहा किंवा कॉफीचे सेवन टाळावे.
दारू : धुम्रपान न सोडण्यात दारूचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत विडी-सिगारेटचे व्यसन सोडायचे असेल तर दारू पिणे टाळायला हवे. दारू पिणारा व्यक्ती धुम्रपानाकडे आकर्षित होऊ लागतो, त्यामुळे धूम्रपान सोडायचे असेल तर दारू आणि बिअर तुम्हाला सोडावी लागेल.
साखरेचे पदार्थ: जर तुम्हाला धूम्रपान सोडायचे असेल, तर तुम्ही चॉकलेट, कँडी आणि इतर गोड पदार्थ खाण टाळायला हवं. कारण या गोष्टींच्या सेवनामुळे धूम्रपानाचे व्यसन अधिक वाढते. तेव्हा साखरयुक्त पदार्थांचे सेवन बंद केल्यास सिगारेट-विडी सोडण्यास मदत होईल.
मसालेदार पदार्थ : जस मसालेदार पदार्थांचे सेवन देखील धूम्रपानाची कारणीभूत ठरू शकते. तेव्हा धूम्रपान करण्याचे व्यसन सोडायचे असेल तर मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करावे अथवा टाळावे.
तळलेले पदार्थ: तळलेले पदार्थ सिगारेट आणि तंबाखूची लालसा वाढवतात. तेव्हा धूम्रपानाची सवय सोडायची असेल तर तळलेले पदार्थ खाणे टाळावे.