NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / चाळीशीतही चेहऱ्यावर हवाय विशी सारखा ग्लो? मग आहारात आजच सामील करा हे 5 पदार्थ

चाळीशीतही चेहऱ्यावर हवाय विशी सारखा ग्लो? मग आहारात आजच सामील करा हे 5 पदार्थ

वाढत्या वयाबरोबर महिलांच्या चेहऱ्यावरील चमक कमी होऊ लागते. तसेच आरोग्यासंबंधित अनेक प्रकारच्या समस्या देखील सुरु होतात. तेव्हा चाळीशी ओलांडल्यावर देखील जर तुम्हाला तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल आणि चेहऱ्यावर तरुणपणी असायचा तसाच ग्लो हवा असेल तर तुमच्या रोजच्या आहारात काही पदार्थ सामील करून घ्या.

15

ग्रीन टी : चेहऱ्यावर चमक राहण्यासाठी आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही ग्रीन टीला रोजच्या आहाराचा सामील करा. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रकारचे अँटी ऑक्सिडंट असतात जे ऊर्जा पातळी आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. यासोबतच ग्रीन टी वृद्धत्वविरोधी समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे आणि हृदयाशी संबंधित समस्या देखील दूर ठेवते.

25

डार्क चॉकलेट : अनेकजण डार्क चॉकलेट खाणे टाळतात. पण डार्क चॉकलेट त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करते. वास्तविक, डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात फ्लेव्हनॉल असते, जे शरीरात अँटी-ऑक्सिडेंट म्हणून काम करतात. यासोबतच, हृदयाच्या समस्या आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.

35

अळशीच्या बिया : तुमच्या रोजच्या आहारात अळशीच्या बियांचाही समावेश करू शकता. केला पाहिजे. वास्तविक, अळशीच्या बियांमध्ये लिग्नॅन्स नावाचे अँटी-ऑक्सिडंट असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्यास सक्षम असतात. इतकंच नाही तर अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ मुबलक प्रमाणात असते, जे त्वचा चमकदार आणि निरोगी बनवण्यात मदत करते.

45

डाळिंब : डाळिंब या फळाला तुम्ही रोजच्या आहाराचा भाग बनवू शकतात. डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्वचेची दुरुस्ती करण्यासोबतच ते त्वचेला उन्हापासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यातही चांगली भूमिका बजावतात.

55

ऑलिव तेल : ऑलिव्ह ऑइलमध्ये चांगल्या प्रमाणात अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. जे त्वचेला वृद्धत्वाच्या समस्येपासून दूर ठेवण्यास मदत करतात. हे केवळ त्वचेसाठीच उत्तम नाही तर टाइप २ मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांना दूर ठेवण्यासाठी देखील प्रभावी आहे.

  • FIRST PUBLISHED :