केसातून दुर्गंधी येत असेल तर चारचौघात केस मोकळे ठेवताना देखील लाज वाटते. तेव्हा ही दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी ४ उपाय करून पाहा.
बॉडी मिस्ट : बॉडी मिस्टचा वापर शरीरातून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी केला जातो. परंतु याचा वापर तुम्ही केसांसाठी देखील करू शकता. दररोज सकाळी याचा हलका स्प्रे केसांवर केल्याने दिवसभर केसातून सुगंध येत राहतो.
परफ्यूम : परफ्यूम सरळ केसांवर स्प्रे करू नका तर तुम्ही ज्याने केस विंचरता अशा हेअर ब्रशवर स्प्रे करा. मग हेअर ब्रशने केस विंचरा. असे केल्याने केसांमधून दुर्गंधी येण्याऐवजी सुगंध येऊ लागेल.
हेअर ड्रायर वापरा : हेअर ड्रायर वापरून केसातील दुर्गंधी दूर केली जाऊ शकते. जर तुमच्या केसातून दुर्गंधी येत असेल तर तुम्ही हेअर ड्रायरच्या मदतीने केसांना ब्लो ड्राय करा, यामुळे केसांतील दुर्गंधी दूर होईल.
लिंबू पाणी : केसातून वास येत असेल तर तुम्ही लिंबू पाणी वापरून केस धुवू शकता. यामुळे केसातील दुर्गंधी दूर होईल आणि केस बराच काळ सुगंधी आणि फ्रेश राहतील.