खाण्यात फायबरचं प्रमाण जास्त असेल तर बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. याशिवाय पोटंही नीट साफ होतं. यासाठी दररोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश फायद्याचा ठरेल.
पोट साफ होण्यासाठी फळांचं सेवन करणं आवश्यक आहे. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. तीन प्रकारच्या ज्यूसमधील कोणत्या एकाचं सेवन दोन ते तीन वेळेस केलं तर 10 दिवसात जड वाटणारं पोट हलकं होऊ शकतं. आणि आतड्यांमधील घाण पूर्णपणे निघून जाऊ शकते.
पोट साफ होत नसेल तर सफरचंदाचा ज्यूस तुमच्यासाठी फायदेशीर आहे. अनेक अभ्यासानुसार, सफरचंदाचा ज्यूस गट डिटॉक्ससाठी फायदेशीर आहे. सफरचंदाचा रस प्यायल्याने पोट लवकर साफ होतं.
व्हेजिटेबल ज्यूसदेखील फायदेशीर असून यात कोबी, ब्रोकोली, पालक, टॉमेटो, गाजर, फ्लावर, कारलं आदीचा उपयोग करू शकतो.
पोट साफ करण्यासाठी लिंबाचा रस घेऊ शकता. लिंबाच्या रसात पुरेशा प्रमाणात विटॅमिन असतं, ज्यामुळे अॅसिडिटी कमी होते. लिंबाचा रस पोटातील हानिकारक बॅक्टरियाचा नायनाट करतो.