तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टींना नकार द्या आणि तुमच्या प्रायोरिटीज सेट करा. (फोटो सौजन्य - Canva)
फळं आणि पालेभाज्या रोज खा. जंक फूड खाणं टाळा. कारण त्याचा मूडवर परिणाम होतो. हेल्दी अन्न खाल्ल्यावर आपोआपच चांगलं वाटतं.
आयुष्यात ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात, त्यावर फोकस करा. यामुळे अधिक सकारात्मक व्यक्ती बनण्यास मदत होईल.
प्रत्येक जण चुका करतो. त्यामुळे त्या चुकांमधून शिका आणि स्वतःला माफ करायला शिका. स्वतःशी नम्र वागा. वाईट परिस्थितीतून चांगलं काय शिकू शकता, याचा विचार करा.
आपलं वेगळेपण स्वीकारा. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं असतं. त्यामुळे ते वेगळेपण स्वीकारणं आवश्यक आहे. यामुळे आत्मविश्वास व स्वतःच्या क्षमतेची जाणीव होते.
तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या व कठीण प्रसंगात प्रोत्साहन देणाऱ्यांबरोबर राहा. याउलट तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करणारे व एनर्जी डाऊन करणाऱ्यांपासून लांब राहा.
तुमचं वागणं, विचार व भावना याबद्दल आत्मचिंतन करा. यामुळे तुम्हाला सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल.
तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात, त्यांचा शोध घ्या व त्यासाठी वेळ काढा. यामुळे तुम्हाला आनंदी वाटेल.
प्रत्येकालाच कधी ना कधी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला गरज असल्यास मदत मागण्यात काहीच गैर नाही.
वर्तमानात जगत असलेल्या क्षणांवर लक्ष केंद्रित करा. भूतकाळ व भविष्याची चिंता करू नका. यामुळे तुम्हाला खूप शांत वाटेल.