NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मेंदूशी निगडीत या 10 खोट्या गोष्टींबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत माहीत नसेल...

मेंदूशी निगडीत या 10 खोट्या गोष्टींबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत माहीत नसेल...

शिस्तबद्ध लोकांचा डाव्या बाजूचा मेंदू तर सर्जनशील लोकांचा उजव्या बाजूचा मेंदू जास्त कार्यशील असतो असं म्हटलं जातं. पण हे पूर्ण असत्य आहे.

110

सर्वसामान्यांमध्ये मेंदूबद्दल नेहमीच चुकीचे समज असतात. त्यातही सांगायचं झालं तर बहुतेक लोकांना आजही असं वाटतं की, मेंदूचा 10 टक्के भागच काम करतो. PET आणि fMRI स्कॅन टेस्टच्या मार्फत आज आपण मेंदूबद्दल आतापर्यंत कोणत्या गोष्टी माहिती नव्हत्या ते जाणून घेऊ.

210

असं म्हटलं जातं की, वाढत्या वयाचा परिणाम मेंदूवरही होतो. मात्र जसं जसं वय वाढत जातं तसे मानसिक कौशल्यामध्येही वाढ होते. व्यक्तीचं ज्ञान, भाषा, शब्दावली, समज, समाधानाची क्षमता आणि भावनिक पातळीवर अधिक भर पडते.

310

असंही म्हटलं जातं की, एकदा का मेंदूला दुखापत झाली की ते पुन्हा कधीच पूर्णपणे दुरूस्त होत नाही. मात्र मेंदूचा निरोगी भाग नुकसान झालेल्या भागाला नव्याने विकसित करण्यास मदत करतो.

410

मेंदूचा प्रत्येक भाग हा वेगवेगळी कामं करतो असंही काहींना वाटतं. मात्र मेंदू हा लवचिक असतो. त्यामुळे कोणतंही काम करण्यात मेंदू सक्षम असतो.

510

शिस्तबद्ध लोकांचा डाव्या बाजूचा मेंदू तर सर्जनशील लोकांचा उजव्या बाजूचा मेंदू जास्त कार्यशील असतो असं म्हटलं जातं. पण हे पूर्ण असत्य आहे. मेंदूचे दोन्ही भाग हे समसमान काम करत असतात.

610

आठवणींबद्दल असं म्हटलं जातं की, तुम्ही जे पाहता आणि अनुभवता त्यावर आठवणी तयार होतात. मात्र भूतकाळातल्या गोष्टी आठवताना सगळ्याच आठवत नाहीत. आठवणीतले सारेच बारकावे लक्षात राहत नाहीत. काहीना काही राहूनच जातं.

710

शास्त्रीय संगीत ऐकल्यानंतर मुलं अधिक हुशार होतात असाही एक समज आहे. पण याबद्दल विज्ञानात कोणताही शोध झालेला नाही.

810

लहानपणी मुलांना मेंदू तल्लख करण्यासाठी अनेक खेळ शिकवले जातात. मात्र BBC ने 18 से 60 वर्षांपर्यंतच्या 8 हजार 600 लोकांना बौद्धिक खेळ खेळण्यास सांगितले. सहा आठवड्यांच्या प्रयोगानंतर मेंदूच्या वाढीत याचा काही फायदा होत नाही.

910

आयुष्यभर एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा IQ लेवल एकसारखाच असतो असं म्हटलं जातं. पण वाढत्या वयानुसार विद्यार्थ्यांचा IQ लेवल वाढत जातो हे सिद्ध झालं आहे. नऊ टक्के विद्यार्थी असेही आहेत ज्यांचा IQ 15 गुणांनीही वाढला.

1010

सर्वसामान्यपणे म्हटलं जातं की, मेंदू तणावात अधिक चांगलं काम करतो. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट तणावात मेंदू अतिशय वाईट काम करतो हे सिद्ध झालं आहे.

  • FIRST PUBLISHED :