Guggenheim संग्रहालयाच्या परिसरात असणाऱ्या कारंज्याजवळ ही मुलगी खेळत आहे. तिला नुसतं खेळताना पाहून तिचे वडील आनंदी दिसत आहेत. स्पेनच्या Bilbao याठिकाणी हा फोटो काढण्यात आला आहे. (फोटो सौजन्य- Reuters)
स्पेनमधील इग्वालॅडा याठिकाणचा हा फोटो आहे. Killian या मुलाने जोरदार उडी मारताना मास्क घालत काळजी तर घेतली आहे. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नाही आहे. स्पेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये लहान मुलांसाठी काही बंधनं अंशत: शिथिल करण्यात आली आहेत. (फोटो सौजन्य- Reuters)
उड्या मारून आनंद व्यक्त केल्यानंतर Killian ने सायकलवरून फेरफटका देखील मारला. या मुलांचा आनंद मोजमाप करता येणार नाही इतका आहे. (फोटो सौजन्य- Reuters)
6 आठवड्यानंतर लॉकडाऊनमधील काही बंधनं अंशत: शिथिल केल्यानंतर Candela Estrella ही चिमुरडी सुद्धा घराबाहेर बागडत आहे. स्पेनच्या मॅड्रिड (Madrid) याठिकाणचा हा फोटो आहे. (फोटो सौजन्य- Reuters)
Egoitz Bijueska हा 9 वर्षाचा मुलगा Guggenheim Museum या परिसरात स्केटबोर्डवर खेळताना दिस आहे. स्पेनमध्ये Bilbao याठिकाणचे हे दृश्य आहे. (फोटो सौजन्य- Reuters)
लहान मुलांसाठी लॉकडाऊनचे काही नियम अंशत: शिथिल केल्यानंतर हे वडील सुद्धा त्यांच्या चिमुरडीला फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेले आहेत. हा फोटो Ronda याठिकाणचा आहे. (फोटो सौजन्य- Reuters)
मॅड्रिडमध्ये राहणाऱ्या मीरियम देल पेसो यांची मुलं पाबलो आणि सोफिया मास्क घालून पार्कमध्ये फेरफटका मारण्यासाठी सज्ज आहेत. (फोटो सौजन्य- Reuters)
मीरियम देल पेसो आणि अलेझॅन्ड्रो हे दाम्पत्य आणि त्यांची मुलं पाबलो आणि सोफिया पार्कमध्ये गप्पा मारताना आहेत. यावेळी सुद्धा त्यांना सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. (फोटो सौजन्य- Reuters)
ला बोला स्ट्रीट याठिकाणी एक महिला तिच्या मुलांबरोबर बाहेर पडली आहे. या फोटोमध्ये ही मुलं उड्या मारत, बागडत चालताना दिसत आहे. स्पेनच्या Ronda याठिकाणी हा फोटो टिपण्यात आला आहे. (फोटो सौजन्य- Reuters)
Puerta del Sol चौकात सुद्धा एक लहान मुलगा चालताना दिसत आहे. त्याच्याबरोबर एक महिला देखील आहे. (फोटो सौजन्य- Reuters)