NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / भारत-चीन / Exclusive : चीनचं पितळ उघडं पडलं; भारतीय सीमेत शस्त्रासह घुसखोरी केल्याचे PHOTOS आले समोर

Exclusive : चीनचं पितळ उघडं पडलं; भारतीय सीमेत शस्त्रासह घुसखोरी केल्याचे PHOTOS आले समोर

चिनी सैन्याने पुन्हा भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चीनने याचा नकार दिला होता, त्याचे Exclusive फोटो समोर आले आहेत

14

सोमवारी सायंकाळी चिनी घुसखोरांचे काही फोटो समोर आले आहेत. चिनी सैन्य पॅंगोगच्या दक्षिण भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होती. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फायरिंग सुरू केली होती.

24

सोमवारी रात्री उशिरा पँगोंग त्सोवर रेषेजवळ (LAC) भारती-चिनी सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. चीनच्या सरकारी मीडिया 'ग्लोबल टाइम्स' ने भारतीय सैनिकांवर पँगोंग त्सोच्या दक्षिणेकडील गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. सैनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुजोर चीनच्या बाजूने सुरुवातीला भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला, त्यानंतर जवानांनी चोख प्रत्युत्तर देत कारवाई केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे.या छायाचित्रांमध्ये चिनी सैनिक दिसत आहेत. यावरुन चिनी सैन्याने भारतीय सीमेत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.

34

चिनी घुसखोरांचे छायाचित्र समोर आल्यामुळे चीनचं खरं रुप समोर आलं आहे. चिनी संरक्षण मंत्रालय, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे वेस्टर्न पीपल्स कमांड, कर्नल झांग शुली यांनी LACजवळील स्थितीबाबत एक निवेदन जारी केलं. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की 'चिथावणीखोरी' भारतीय सैनिकांच्या बाजून गोळीबार करण्यात आल्यानं चिनी सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

44

भारतीय पोस्टजवळ हे चिनी सैनिक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. सोमवारी रात्री पुन्हा एकदा चिनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये गोळीबार झाला. यामुळे LACवर सध्या तणावाचं वातावरण आहे. LACवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी वारंवार बैठकांऱ्या फेऱ्या होत असून त्यातून तोडगा मात्र निघत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

  • FIRST PUBLISHED :