कोरोनाच्या महामारीनंतर इम्युनिटी मजबूत ठेवणं आणि ऑक्सिजन लेव्हल मेंटेन राखणं आवश्यक असल्याचे सर्वांच्याच लक्षात आलं आहे. आपण सगळेजण इम्युनिटी वाढवण्यासाठी फळं खातो. पण, फळांमध्ये रक्तातील ऑक्सिजनची लेव्हल वाढवण्याचीही क्षमता असते, हे आपल्याला कदाचित माहीत नसेल. फळांमुळे अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळतात.
ब्लूबेरी - रक्तामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी, ब्लूबेरी (करवंद) चा आपल्या आहारात समावेश करणं आवश्यक आहे. यात प्रोटिन,फायबर,कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, व्हिटॅमिन ई, सी, बी 6 आणि थायमिन सारखे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे रक्तातील ऑक्सिजन लेव्हल वाढण्यासह रोग प्रतिकारशक्ती देखील वाढेल.
स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरीमध्ये राइबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी 6, फॉलेट, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक सारखे पोषक द्रव्य देखील असतात. रक्तातील ऑक्सिजन वाढवणं आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी खाण्याचे बरेच फायदे असतात.
नाशपती - आहारात नाशपतीचा समावेश केल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. नाशपातीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर आणि कॉपर यासारखे पोषक घटक असतात.
अननस - अननसमध्ये व्हिटॅमिन बी, फॉलेट, थायमिन,पॅन्टोथेनिक ऍसिड, ब्रोमेलेन, नियासिनसारखे पोषक द्रव्य असतात. अननसाने शरीराला बरेच फायदे होतात. ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते आणि रोग प्रतिकारशक्ती देखील बळकट होते.
किवी - किवीच्या सेवनाचे देखील शरीराला खूप फायदे आहेत. यामध्ये कॅल्शियम,आयर्न,मॅग्नेशियम,फॉस्फरस,पोटॅशियम,झिंक,कॉपर,सेलेनियम आणि प्रोटिन यासारखे अनेक पोषक घटक असतात. जे रक्तातील ऑक्सिजन वाढवण्यास तसेच, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
टरबूज - टरबूजमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे रक्तातील ऑक्सिजन लेव्हल आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते,
पपई - पपई आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यातील पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स,प्रोटिन,व्हिटॅमिनए,बी,सी,फायबर आणि कॅल्शियम हे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यात मदत करतात. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.
आंबा - रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठीही आंबा खाणं फायदेशीर ठरते. याशिवाय व्हिटॅमिन सी, थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन,कॅल्शियम, लोह,मॅग्नेशियम,फॉस्फरस,सोडियम आणि झिंक हे घटक आंब्यामध्ये असतात ज्यामुळे शरीराला पोषण मिळतं.