NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / मान, पाठदुखी किंवा वेदनांकडे करू नका दुर्लक्ष; न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची असू शकते सुरुवात

मान, पाठदुखी किंवा वेदनांकडे करू नका दुर्लक्ष; न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची असू शकते सुरुवात

न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर (Neurological disorders) झाल्यास शारीरिक हालचालीत (Physical Movement) अडचणी निर्माण होतात. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये हा आजार जास्त दिसतो.

111

आपली नर्वस सिस्टम (Nervous System)दिवसभरात कितीतरी स्वेच्छीक आणि अनेच्छीक कामं करण्यात मदत करत असते. पण,जेव्हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होते. तेव्हा, हालचाल करणं काठीण होतं.

211

शरीराचा समतोल जातो, नजर कमजोर होते, स्मरणशक्ती कमी होते, जेवण गिळण्यातही अडचणी येतात हा असा आजार आहे जो,शरीराची सेंट्रल आणि पेरिफेरल सिस्टीमवर परिणाम करतो.

311

यात मेंदू, मणका,क्रॅनियल नर्व्ह,मज्जातंतूची मुळं,नसा,ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम,न्यूरोमस्क्यूलर जंक्शन आणि स्नायू यांचा समावेश असतो. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये नर्वस सिस्टीमवर परिणाम होतो. त्यामुळे मायग्रेन, फिट येणं,अल्जायमर, डिमेन्सिया असे आजार होतात.

411

मान आणि डोकेदुखी, पाठदुखी, शरीराच्या विविध भागात वेदन अशी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची लक्षणं आहेत. सामान्य वाटणारी लक्षणं कधीकधी भयंकर आजाराची लक्षणं असू शकतात.

511

मान अवघडणे, तीव्र डोकेदुखी ही लक्षण मेनिंजायटीस,मेंदूत रक्तस्राव,ब्रेन ट्यूमर सारख्या गंभीर आजारांची सुचना असू शकते.

611

सतत अशक्तपणा वाटणे, तीव्र अंगदूखी हे अम्योट्रॉफिक लेटरल स्क्लेरोसिसचं लक्षणं असू शकतं.

711

नजर कमजोर होणं, अशक्तपणा वाटणं, चक्कर येणं, बोलताना किंवा गिळताना अडचणं येणं. मेंदूला कमी रक्तपुरवठा किंवा रक्तस्त्राव यामुळे अशी लक्षणं दिसतात. या लक्षणांमध्ये त्वरित उपचाराची आवश्यकता असते.

811

मेंदूच्या हालचालीमध्ये अडचणी आल्यामुळे ही लक्षणं दिसतात. चेहऱ्यात काही लहान बदल होतात किंवा चेहऱ्यावर किंवा इतर अवयवांवर मुंग्या येतात, वेळेवर उपचार न केल्यास धोका वाढतो.

911

मसल्स अवघडणे, अंग कापणे, स्मरणशक्ती कमी होणं, मानसिक ताकद कमी होणं अशी लक्षणं दिसतात. शक्यतो ही लक्षणं वयोवृद्धांमध्ये जास्त दिसतात. यामुळे अल्जायमरही होऊ शकतो. त्यामुळे छोट्याछोट्या गोष्टींची आठवण राहत नाही.

1011

न्यूरोलॉजिकल डिस्ऑर्डर हा आजार लगेच बरा होत नाही. परंतु रुग्णाची चांगली काळजी घेतल्यास, रूग्ण बराच काळ निरोगी राहू शकतो.

1111

गंभीर समस्या असल्यास ऑपरेशन करण्याचा सल्ला न्युरो सर्जन देतात. या आजारात घाबरून जाऊ नये. उलट रुग्णाला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :