काही काळापूर्वी दक्षिण कोरियामध्ये एक संशोधन झाले होते. ज्यावरून हे दिसून आले की तृतीयपंथी सामान्य माणसांपेक्षा जास्त काळ जगतात. साधारणपणे तृतीयपंथीयांच्या आयुष्याकडे लोकांनी फारसे लक्ष दिलेले नाही, पण त्यांचे आयुष्य कसे असते हा नेहमीच कुतुहलाचा प्रश्न राहिला आहे. ते त्यांचे बंध कसे तयार करतात? त्यांच्या आनंदाचे रहस्य काय आहे? (शटरस्टॉक)
संशोधकांनी कोरियन द्वीपकल्पात शेकडो वर्षे वास्तव्य करणाऱ्या नपुंसकांच्या जीवनाशी संबंधित घरगुती कागदपत्रांचा अभ्यास केला. यामध्ये कास्ट्रेशनमुळे तृतीयपंथी जास्त काळ जगत असल्याचे समोर आले आहे. या संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की तृतीयपंथी इतर लोकांपेक्षा सुमारे 20 वर्षे जास्त जगतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे एक वैज्ञानिक सत्य आहे की पुरुषांचे हार्मोन्स त्यांचे वय कमी करतात. (शटरस्टॉक)
प्रत्येक संस्कृतीत आणि सभ्यतेमध्ये किन्नरांची भूमिका महत्त्वाची असते. ते काही खास गोष्टी करतात. उदाहरणार्थ, हरम किंवा जनानखाना सांभाळणे ही तृतीयपंथीयांची विशेष जबाबदारी होती. हरम म्हणजे राजघराण्यातील महिलांचे वास्तव्य असलेली जागा. संशोधकांच्या मते, जर मुलांचे अंडकोष बालपणाच्या सुरुवातीलाच कापले गेले तर त्यांच्या विकासात अडथळा येतो आणि ती मुले कधीही पूर्णतः पुरुष होऊ शकत नाहीत. (शटरस्टॉक)
या संशोधनाशी निगडित शास्त्रज्ञ डॉ. शिओल कू ली यांनी सांगितले की, "कोरियामध्ये राहणाऱ्या किन्नरांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, त्यांच्यात महिलांसारखी काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की त्यांना मिशा नसणे, त्यांचे नितंब आणि छाती खूप मोठी असणे. त्यांचा आवाज गंभीर असतो." कोरियामध्येही किन्नर शाही दरबारात काम करत असत. आपल्या देशात मुघलांच्या काळातही नपुंसकांना दरबारापासून ते राणीवस्यापर्यंत नोकऱ्या दिल्या जात होत्या. त्यांची भूमिका खास होती. (शटरस्टॉक)
कोरियामध्ये, किन्नरांचा जन्म 1556 ते 1861 दरम्यान झाल्याचे सांगितले जाते. त्यांचे सरासरी वय 70 वर्षे होते आणि त्यातील तीन 100 वर्षांपेक्षा जास्त जगले. त्यानंतर त्यांची संख्या देशभरात सुमारे 5 लाख असल्याचे आढळून आले. (शटरस्टॉक)
कोरियातील तृतीयपंथीयांच्या तुलनेत, खानदानी घराण्यातील पुरुषांचे सरासरी वय 50 पेक्षा किंचित जास्त होते, तर राजघराण्यातील पुरुषांचे सरासरी वय फक्त 45 वर्षे होते. त्यावेळच्या स्त्रियांबद्दल अशी कोणतीही माहिती नाही की त्यांची तुलना तृतीयपंथीयांशी करता येईल. जवळजवळ सर्वच समाजात स्त्रियांचे वय पुरुषांपेक्षा जास्त आहे. मात्र, आजपर्यंत याचे कोणतेही स्पष्ट कारण सापडलेले नाही. एक मत असे आहे की हे पुरुषांमध्ये आढळणाऱ्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे असे होते. (शटरस्टॉक)
ब्रिटनमध्ये 'वृद्धापकाळ'वर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरियामध्ये करण्यात आलेले हे संशोधन खूपच रंजक आहे, पण किन्नरांच्या दीर्घायुष्याचे एक कारण त्यांची राहण्याची पद्धत देखील असू शकते. (शटरस्टॉक)