NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Explainer / मुस्लीम देश असलेल्या इंडोनेशियाच्या चलनावर गणपतीचे चित्र का? कारण आहे खूपच विशेष

मुस्लीम देश असलेल्या इंडोनेशियाच्या चलनावर गणपतीचे चित्र का? कारण आहे खूपच विशेष

इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे, पण पूर्णपणे हिंदू रंगात रंगला आहे. इथं तुम्हाला सर्वत्र हिंदू देवतांच्या मूर्ती आणि मोठी मंदिरं पाहायला मिळतील. लोकांची नावेही हिंदू ठेवली जातात. हिंदू परंपरा पाळल्या जातात. विशेष म्हणजे तिथल्या चलनात गणपतीचे चित्र आहे.

15

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हा गणेशाचा फोटो भारतात नसून जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशियाच्या नोटेवर छापण्यात आला आहे. इंडोनेशियातील सुमारे 87.5 टक्के लोक इस्लाम धर्माचे पालन करतात. तिथे फक्त 3 टक्के हिंदू लोकसंख्या आहे, चला जाणून घेऊया तिथे नोटेवर गणपती का आले आहेत.

25

नोटेवर छापलेले गणेशाचे चित्र : इंडोनेशियाच्या चलनाला रुपिया म्हणतात. तिथे 20 हजारांच्या नोटेवर श्रीगणेशाचे चित्र आहे. खरंतर इंडोनेशियामध्ये श्रीगणेशाला शिक्षण, कला आणि विज्ञानाची देवता मानले जाते.

35

इंडोनेशियामध्ये 20 हजारांच्या नोटेवर समोर गणपतीचे चित्र आणि पाठीमागे क्लासरूमचे चित्र आहे, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. यासोबतच या नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्राचे छायाचित्रही आहे. देवांतर हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचे नायक राहिले आहेत.

45

असे म्हटले जाते की काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था फारच ढासळली होती. तिथल्या राष्ट्रीय आर्थिक विचारवंतांनी खूप विचार करून वीस हजारांची नवी नोट जारी केली, ज्यावर श्रीगणेशाचे चित्र छापलेले होते. लोकांचा असा विश्वास आहे की या कारणास्तव अर्थव्यवस्था आता मजबूत आहे.

55

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या देशात केवळ गणेशच नाही तर इंडोनेशियन आर्मीचा मॅस्कॉट हनुमान जी आहे आणि तिथल्या एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावर अर्जुन आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. चित्रांमध्ये कृष्ण आणि अर्जुन दिसत आहेत तसेच घटोत्कचाची मूर्तीही बसवली आहे.

  • FIRST PUBLISHED :