NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Explainer / देशातील असा नेता जो ज्योतिषाच्या सांगण्यावरून रात्री महिलांचे वस्त्र करायचा परिधान

देशातील असा नेता जो ज्योतिषाच्या सांगण्यावरून रात्री महिलांचे वस्त्र करायचा परिधान

Death Anniversary NT Ramarao : एनटी रामाराव हे 80 च्या दशकात दक्षिण भारतातील शक्तिशाली आणि लोकप्रिय नेते होते. एक काळ असा होता की विरोधी पक्षांच्या आघाडीतही ते पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आले होते. राजकारणात येण्यापूर्वी ते साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार होते. रामारावांचा ज्योतिषांवर प्रचंड विश्वास होता.

110

तेलुगू चित्रपटांचा लोकप्रिय नायक एनटी रामाराव आंध्र प्रदेशच्या राजकारणात धूमकेतूसारखा उदयास आला. त्यांनी तेलगू देसम या नावाने आपला नवीन राजकीय पक्ष स्थापन केला. त्यानंतर 1984 मध्ये प्रचंड बहुमताने विजयी होऊन आंध्र प्रदेशात आपले सरकार स्थापन केले. NT रामाराव यांची 18 जानेवारी रोजी पुण्यतिथी आहे. NTR काही वर्षांतच दक्षिण भारतातील सर्वोच्च नेत्यांपैकी एक झाले. राष्ट्रीय राजकारणात येण्यासोबतच त्यांना पंतप्रधान होण्याचीही इच्छा होती.

210

जेडीयूचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी एका हिंदी राष्ट्रीय वृत्तपत्रात त्यांच्यावर लेख लिहिला होता की, पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून विचित्र गोष्टी केल्या. त्यागी यांनी आपल्या लेखात लिहिलं आहे की, त्याकाळी अशी चर्चा होती की एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून त्यांनी रात्री महिलांचे कपडेही घालायला सुरुवात केली. त्याचवेळी, त्यांनी हिंदी शिकण्यासाठी हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानी दोन हिंदी शिक्षकांना नियुक्त केले होते.

310

NT रामाराव यांचा जन्म 28 मे 1923 रोजी आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात झाला. तेव्हा तो मद्रास प्रेसिडेन्सीचा एक भाग होता. त्यांचे आई-वडील शेतकरी होते. नंतर त्यांना त्यांच्या मामाने दत्तक घेतले. ज्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याच वर्षी त्यांना मद्रास सर्व्हिस कमिशनमध्ये सब रजिस्ट्रारची चांगली नोकरी मिळाली. पण अभिनयात करिअर करण्यासाठी त्यांनी अवघ्या तीन आठवड्यात ही नोकरी सोडली.

410

असे म्हटले जाते की, एनटीआर यांचा शालेय जीवनापासूनच अभिनयाकडे कल होता. शाळेत त्यांनी केलेल्या पहिल्या नाटकात त्यांनी स्त्री पात्र रंगवलं होतं. 1949 मध्ये माना देशम नावाच्या त्यांच्या पहिल्या चित्रपटात ते पोलिस अधिकारी झाले होते. एनटीआर यांनी धर्मावर आधारित चित्रपटांमध्ये अधिक काम केले. त्यांनी 17 चित्रपटांमध्ये कृष्णाची भूमिका साकारली होती, यावरुन याचा अंदाज येऊ शकतो.

510

त्यांच्याबद्दलचा एक प्रसंग नंतर खूप गाजला. 1984 मध्ये जेव्हा राज्यपाल रामलाल यांनी त्यांचे सरकार पाडले आणि अल्पसंख्याक सरकार स्थापन केले, तेव्हा एनटीआर यांनी आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रपती झैल सिंग यांना भेटण्याचा निर्णय घेतला. झैल सिंग यांनी त्यांना वेळ दिला. तेव्हा आजच्यासारखी अतिरिक्त विमानाची सोय नव्हती. त्यामुळे आमदारांचा जत्था ट्रेनने दिल्लीला रवाना झाला. त्यामुळे दिल्ली सरकार विचलित झाले होते. ट्रेनचा वेग ताशी 20 किलोमीटर इतका कमी करण्यात आला. ट्रेन 10 तास उशिराने दिल्लीला पोहोचली. राष्ट्रपतींना भेटण्याची वेळ टळून गेली होती. पण प्रेसच्या दबावाखाली राष्ट्रपतींना एनटीआर आणि त्यांच्या 150 हून अधिक आमदारांची भेट घ्यावी लागली. एनटीआर स्वत: व्हीलचेअरवर बसून राष्ट्रपती भवनात गेले. रामलाल यांना राजीनामा द्यावा लागला. एनटीआर पुन्हा मुख्यमंत्री झाले.

610

त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे अभ्यासादरम्यान रामाराव कुटुंबाला मदत करण्यासाठी विजयवाड्यातील स्थानिक हॉटेलमध्ये दूध विकायचे. 1942 मध्ये त्यांनी आपल्या मामाच्या मुलीशी लग्न केले. त्यांनी दोन लग्ने केली होती. त्यांना एकूण 12 मुले होती. त्याला आठ मुलगे आणि चार मुली होत्या. 1993 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी, रामाराव यांनी तेलुगू लेखिका 'लक्ष्मी पार्वती'शी पुनर्विवाह केला. परंतु, एनटीआरच्या कुटुंबाने लक्ष्मीला कधीही स्वीकारले नाही.

710

एनटीआर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीसोबतही काम केले होते, दोघांच्या वयात 40 वर्षांचा फरक होता. जरी एनटीआरने पटकथा लेखनाचा कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम केला नसला तरी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये पटकथेचे काम केले.

810

एनटीआर इतके लोकप्रिय होते की लोक त्यांना देव मानत होते. याचा फायदा त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतही झाला. त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांचे राजकारणही लोकांमध्ये लोकप्रिय होते. 1983 ते 1994 या काळात ते तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले.

910

एनटी रामाराव इतके लोकप्रिय होते की इंदिरा गांधींच्या हत्येनंतर संपूर्ण देशात काँग्रेसची लाट असताना आंध्र प्रदेशात काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. इतकेच नाही तर तेलुगु देसम हा लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्षही बनला.

1010

1989 च्या निवडणुकीत तेलुगू देसम पक्ष सत्ताविरोधी लाटेमुळे निवडणुकीत पराभूत झाला. काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. एनटी रामाराव 1994 मध्ये सत्तेत परतले. त्यांच्या तेलुगु देसम पक्षाने 226 जागा जिंकल्या. यावेळी एनटी रामाराव केवळ 9 महिने मुख्यमंत्री म्हणून राहू शकले कारण त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी पक्षात घुसखोरी केली आणि रामाराव यांना पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदावरून हटवले.

  • FIRST PUBLISHED :