NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Explainer / व्लादिमीर पुतिन यांचे विशेष विमान म्हणजे अभेद्य किल्ला! हवेतून देशावर ठेऊ शकतात नियंत्रण

व्लादिमीर पुतिन यांचे विशेष विमान म्हणजे अभेद्य किल्ला! हवेतून देशावर ठेऊ शकतात नियंत्रण

रशियाने (Russia) अखेर युक्रेनवर (Ukraine) हल्ला केला आहे. अमेरिका आणि नाटो देशांच्या दबावाला बळी न पडता युक्रेनशी दोन हात करण्याची तयारी करणाऱ्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे आता साऱ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत. पुतीन हे शक्तिशाली नेते आहेत, त्यांनी रशियाला बदलून टाकले आहे. ते ज्या विमानातून प्रवास करतात ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जगातील विशेष विमान मानले जाते.

18

हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे खास विमान आहे. पुतिन यांच्या विमानाला एअरक्राफ्ट नंबर 01 असे म्हणतात, ज्याला फ्लाइंग क्रेमलिन असेही म्हणतात. हे विमान Ilyusin Il-96-300PU या नावाने ओळखले जाते. सर्व तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हे अत्यंत आधुनिक आणि विशेष विमान आहे. आतापर्यंत, रशियाच्या अध्यक्षांसाठी Il-96 विमानाचे अनेक मोडिफाइड प्रकार विकसित केले गेले आहेत. हे विमान पहिल्यांदा रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनी वापरले होते. आता पुतिन त्यांचे अधिक विकसित विमान वापरतात.

28

हे एक विशेष विमान आहे, ज्याद्वारे ते कोणत्याही उंचीवरुन मॅसेज घेऊ किंवा पाठवून शकतात. ते जगात कुठेही असो किंवा कोणत्याही उंचीवर असले तरी त्याची खास संपर्क यंत्रणा सर्वत्र कार्यरत असते. याच्या मदतीने जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून संदेश पाठवता आणि प्राप्त करता येतात.

38

यात 4 कॉन्फरन्स रूम आहेत. पुतीन यांची जीम आहे. तसेच त्याची शयनकक्ष आणि वेगळी स्पेशल कॉन्फरन्स रूम आहे. याशिवाय डायनिंग रूम देखील आहे. पुतिन जेव्हा प्रवास तेव्हा ते इथेच जेवण करतात. अनेकदा त्यांच्यासोबत प्रवास करणारे पाहुणेही या सुविधांचा लाभ घेतात.

48

अतिशय आरामदायी आणि सुरक्षित विमानाचा वापर पुतिन देश-विदेशातील प्रवासासाठी करतात. या विमानातून प्रवास करताना त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. त्यावर हवाई हल्ला करण्याचा विचार तर लांबच. हे विमान लेझर क्षेपणास्त्रविरोधी संरक्षणाने सुसज्ज आहे. तसेच कोणत्याही रॉकेट किंवा बंदुकीने त्याला लक्ष्य करता येत नाही. त्याची नियमित चाचणी केली जाते. यासाठी आठवड्यातून एकदा याची उड्डाणचाचणी केली जाते.

58

सामान्यतः विमान दोन इंजिनांचे असते. मात्र, याला 4 इंजिन आहे. हे 55 मीटर लांब आणि पंखासोबत 60 मीटर रुंद आहे, त्याचा वेग 900 किमी प्रतितास असतो. असे म्हणतात की जेव्हा हे विमान पुतिन यांच्यासाठी बनवले जात होते, तेव्हा ते रशियाचे पंतप्रधान होते, ते स्वत: एअरक्राफ्ट प्लांटमध्ये जाऊन त्याचे निरीक्षण करायचे.

68

राष्ट्रपतींच्या विमानासोबत अन्य विमानांचा ताफाही उडतो. तीन विमाने अगदी सारखीच असतात. पुतीन यांच्या प्रत्येक भेटीत ही विमाने मागे-पुढे दिसतात. हे 15-15 मिनिटांच्या अंतराने सोडली जातात. याचे एक कारण सुरक्षेचे आहे आणि एक कारण म्हणजे पुतिन जिथे जात असतील तिथे त्यांच्या विमानात काही दोष आढळल्यास त्यांनी लगेच दुसऱ्या विमानाचा वापर सुरू करावा.

78

पुतिन जेव्हा त्यात प्रवास करतात तेव्हा या विमानात राहून ते संपूर्ण रशियावर नियंत्रण ठेवू शकतात असे मानले जाते. एवढेच नाही तर या विशिष्ट विमानात राष्ट्रपतींचे अणु नियंत्रण बटण देखील आहे, म्हणजे विमानात असताना ते देशाच्या अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवू शकतात किंवा त्याच्या हल्ल्याचे बटण दाबू शकतात, ज्यामुळे रशियाची अणुहल्ला यंत्रणा त्वरित कार्यान्वित होईल.

88

त्याची किंमत सुमारे 500 मिलियन (सुमारे 365 कोटी रुपये) आहे.

  • FIRST PUBLISHED :