प्लास्टिक प्रदूषण (Plastic Pollution) ही खूप मोठी समस्या आहे. प्लास्टिकचा वापर बंद करणे ही एक मोठी समस्या असताना दुसरीकडे प्लास्टिक कचऱ्याला सामोरे जाण्याचे आव्हानही भयंकर स्वरूप धारण करत आहे. यावर बरेच संशोधन चालू आहे. आता शास्त्रज्ञांनी सरोवरांमध्ये असे नैसर्गिक जीवाणू (Bacteria in Lakes) शोधून काढले आहेत जे नैसर्गिक पदार्थांपेक्षा प्लास्टिकच्या अवशेषांवर जलद आणि अधिक प्रभावीपणे वाढतात. या जिवाणूंची खास गोष्ट म्हणजे ते प्लॅस्टिकमधील कार्बन संयुगे (Carbon compounds) तोडतात आणि या तुटलेल्या पदार्थाचा ते अन्न म्हणून वापर करतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
या अभ्यासात 29 युरोपियन तलावांचा (European lakes) समावेश करण्यात आला होता. संशोधकांचे म्हणणे आहे की या विशिष्ट प्रजातीच्या बॅक्टेरियासह जलस्रोत समृद्ध करणे हा पर्यावरणातून प्लास्टिक काढून टाकण्याचा एक नैसर्गिक मार्ग असू शकतो. त्याचा परिणामही अगदी स्पष्टपणे दिसून येतो. प्लॅस्टिकच्या प्रदूषणामुळे तलावाच्या पाण्यात कार्बनची पातळी केवळ 4 टक्क्यांनी वाढते तेव्हा जिवाणूंची वाढ दुपटीने वाढते. अभ्यासानुसार, सरोवरांमध्ये आढळणारे जीवाणू सरोवरांमधील प्लास्टिक तसेच इतर नैसर्गिक कार्बन संयुगे तोडतात. परंतु, हे जीवाणू नैसर्गिकऐवजी प्लास्टिक कार्बनला प्राधान्य देतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
याचा अर्थ असा नाही की प्लास्टिक प्रदूषणापासून (Plastic pollution) आपल्याला मुक्ती मिळेल. कारण प्लास्टिकमधील काही संयुगे पर्यावरणावर विषारी प्रभाव टाकतात. या अभ्यासाचे परिणाम नुकतेच नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झाले आहेत. जिवाणू प्रथम प्लास्टिक खातात कारण त्यांना तोडणे सोपे जाते. त्यानंतरच ते कठोर अन्नाकडे वळतात जे नैसर्गिक कार्बन सामग्री आहे (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
संशोधकांचे म्हणणे आहे की प्लास्टिक प्रदूषणाचा तलावातील संपूर्ण अन्न साखळीवर परिणाम होतो. कारण, अधिक बॅक्टेरिया म्हणजे बदके आणि मासे यासारख्या मोठ्या जीवांसाठी अधिक अन्न. या परिणामातील विविधता सरोवराच्या पाण्यात असलेल्या जीवाणूंच्या प्रजातींच्या विविधतेवर अवलंबून असते. अधिक वैविध्यपूर्ण प्रजाती असलेल्या सरोवरांमध्ये प्लास्टिक प्रदूषण अधिक चांगले नियंत्रित केले जाते. याच संशोधनाच्या लेखकांनी गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की युरोपियन तलाव हे मायक्रोप्लास्टिक प्रदूषणाचे प्रमुख हॉटस्पॉट बनले आहेत. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
प्लास्टिकचे विघटन करून जीवाणू साधे कार्बन पदार्थ सोडतात. संशोधकांना असे आढळले की ही संयुगे पाने आणि डहाळ्यांसारख्या सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाने तयार झालेल्या साध्या कार्बनपेक्षा भिन्न आहेत. प्लास्टिकपासून तयार झालेले पदार्थ चिकटृ किंवा सॉफ्टनर्सच्या वापराने तयार केले जातात. नवीन अभ्यासात असेही आढळून आले आहे की जीवाणूंनी कमी विशिष्ट नैसर्गिक कार्बन सामग्री असलेल्या तलावांमधून अधिक प्लास्टिकचे प्रदूषण काढून टाकले. याचे कारण असे की त्या तलावांमध्ये अन्नाचे थोडेसे स्रोत होते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दुर्दैवाने प्लास्टिकमुळे अनेक दशके पर्यावरणाचे प्रदूषण होत राहील. प्लास्टिक कचरा कमी करू शकणारे आणि प्रदूषणाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठीही उपयुक्त ठरणारे जीवाणू शोधण्यात संशोधन कार्य यशस्वी झाले आहे. या अभ्यासात, संशोधकांनी ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 या कालावधीत स्कॅन्डिनेव्हियामधील 29 तलावांचे नमुने घेतले होते. हे तलाव वेगवेगळ्या उंचीचे, तापमानाचे, खोलीचे आणि विविधतेचे तलाव आहेत. संशोधकांनी या तलावांमध्येही प्लास्टिक टाकले होते आणि ते विरघळल्यानंतरच त्याचे नमुने घेण्यात आले. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
या अभ्यासात संशोधकांनी जीवाणूंची वाढ मोजली आहे. प्लास्टिकमध्ये विरघळलेल्या कार्बनचे प्रमाण असलेल्या पाण्यातील जिवाणूंचे वजन प्रभावीपणे दुप्पट होते. त्याचवेळी, 72 तासांमध्ये जीवाणूंनी अर्धे कार्बन खाल्ले होते. संशोधकांनी सांगितले की त्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जेव्हा प्लास्टिकचा कचरा तलाव आणि नद्यांमध्ये प्रवेश करतो तेव्हा संपूर्ण परिसंस्थेवर परिणाम होतो. यासोबतच त्यांचा अभ्यास लोकांना प्लास्टिक कचरा फेकताना अधिक सावध राहण्याची प्रेरणा देईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)