विकी कौशल हे नाव आता कोणालाही नवं नाही. अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.
तसेच आघाडीची अभिनेत्री कतरीना कैफसोबत लग्न करत विकी कौशल प्रचंड चर्चेत आहे.
विकी सध्या इंजडस्ट्रीतील महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तसेच त्याच्याकडे अफाट संपत्ती आहे.
आज आलिशान बंगल्यात राहणारा आणि महागड्या गाड्यांमधून फिरणारा विकी कौशल कधीकाळी मुंबईतील एका चाळीत राहात होता.
अभिनेत्याने नुकतंच म.टा.ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्याचा जन्म मुंबईतील मालाड याठिकाणी असणाऱ्या मालवानी चाळीत झाला होता.
अभिनेत्याने सांगितलं की, ही श्रीमंती पाहण्याआधी त्याच्या आई वडिलांनी आणि त्यांनी दहा बाय दहाच्या खोलीत आपलं आयुष्य घालवलं आहे.
सध्या विकी कौशल आपल्या 'जरा हटके जरा बचके' सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो सारा अली खानसोबत झळकला आहे.