आज 21 जून आजचा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.
आजच्या दिवसाचं निमित्त साधून मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी देखील व्यायामाचं महत्व आपल्या चाहत्यांना समजावून सांगितलं. यासाठी त्यांनी स्वत: योग करतानाचे फोटो देखील शेअर केले.
मात्र या सर्व कलाकारांमध्ये मराठी अभिनेत्री कृतिका गायकवाड सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
बंदिशाळा या चित्रपटातून नावारुपास आलेल्या कृतिकानं चक्क मुंबईच्या रस्त्यावर एशियाटिक लायब्ररी समोर योगा केला.
मुंबईची गोष्टच न्यारी असं म्हणत तिनं हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे तिनं व्यायामाचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
21 जून हा वर्षातील सर्वात मोठी दिवस असतो. योग देखील एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य देखील प्रदान करतो. त्यामुळं 21 जूनला योगा दिवस साजरा करतात.
21 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच हा दिवस (Yoga Day) साजरा करण्यात आला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 27 सप्टेंबर 2014 रोजी पुढाकार घेतला होता.
11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या 177 सदस्यांनी 21 जून रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
पंतप्रधान मोदींचा हा ठराव 90 दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर झाला. हा संयुक्त राष्ट्रातील कोणत्याही दिवसाच्या ठरावाच्या मंजूरीसाठी लागलेला सर्वात कमी कालावधी आहे.
दरवर्षी योग दिन वेगवेगळ्या थीमच्या आधारे साजरा केला जातो. यावर्षी 2021 च्या योग दिनाची थीम ‘बी विथ योगा, बी अॅट होम’ म्हणजेच ‘योगासह रहा, घरी रहा’ अशी आहे.
दरवर्षी योग दिन वेगवेगळ्या थीमच्या आधारे साजरा केला जातो. यावर्षी 2021 च्या योग दिनाची थीम ‘बी विथ योगा, बी अॅट होम’ म्हणजेच ‘योगासह रहा, घरी रहा’ अशी आहे.